पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरात बांधकामांना ओसी देऊ नका -हायकोर्ट

पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरात बांधकामांना ओसी देऊ नका -हायकोर्ट

पाणीटंचाईमुळे पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरातील बांधकामांना ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र देण्यास न्यायालयाने स्थगिती दिलीय

  • Share this:

23 जून : मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला चपराक दिलीय. पाणीटंचाईमुळे पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरातील बांधकामांना ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र देण्यास न्यायालयाने स्थगिती दिलीय.

बाणेर, बालेवाडी या परिसरात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे पालिकेने या परिसरातील बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र देऊ नका, असा आदेश न्यायालयाने दिलाय. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने या प्रकरणी पुणे महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलंय. त्यानंतरच ही स्थगिती उठवण्याबाबच पुढचे निर्देश देण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 09:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading