पुलवामा हल्ला, Airstrike आणि आता अभिनंदनच्या सुटकेवरून बॉलिवूडमध्ये नवा वाद!

पुलवामा हल्ला, Airstrike आणि आता अभिनंदनच्या सुटकेवरून बॉलिवूडमध्ये नवा वाद!

पुलवामा, बालाकोट ते वाघा बॉर्डर या घटनाक्रमावर 'उरी'प्रमाणे चित्रपट बनवण्यासाठी बॉलिवूड निर्माते आतूर झाले आहेत. अजून सुरूही न झालेल्या चित्रपटाच्या नावावरून जबरदस्त वाद सुरू झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : पुलवामामध्ये CRPF च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर 12 दिवसांत भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न हाणून पाडताना विंग कमांडर अभिनंदन यांच्या विमानाला अपघात झाला आणि अभिनंदन पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात गेले. भारताच्या वाढत्या दबावामुळे पाकिस्तान सरकार विंग कमांडर अभिनंदन यांना शुक्रवारी भारताकडे सुपूर्द करणार आहे. या सर्व नाट्यमय घटनांकडे बॉलिवूडच्या फिल्म मेकर्सची नजर होतीच. आता या घटनाक्रमावर चित्रपट बनवण्यासाठी ते आतूर झाले आहेत.

पुलवामा, बालाकोट ते वाघा बॉर्डर या घटनाक्रमावर 'उरी'प्रमाणे चित्रपट बनवण्यासाठी बॉलिवूड निर्माते आतूर झाले आहेत. अजून सुरूही न झालेल्या चित्रपटाच्या नावावरून जबरदस्त वाद सुरू झाले आहेत. देशात एका बाजूला अभिनंदन यांच्या सुटकेमुळे उत्साही वातावारण आहे तर दुसऱ्या बाजुला बॉलिवूडच्या निर्मात्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. पुलवामा हल्ल्यापासून ते आत्तापर्यंतच्य़ा सर्व घटनाक्रमावर चित्रपट बनवण्यासाठी बॉलिवूड निर्मात्यांमध्ये अक्षरश: स्पर्धा लागली आहेच पण यासोबतच आता चित्रपटांच्या नावारून  वादाची ठिणगी पडली आहे.

हफिंग्टन पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, यासर्व घटनाक्रमावर चित्रपट काढण्यासाठी, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स एसोसिएशनमध्ये निर्मात्यांची रीघ लागली होती. तेथील उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार हा नजारा काहीसा जत्रेसारखाच होता. सर्वात जास्त गर्दी 26 फेब्रुवारीला पहायला मिळाली होती जेव्हा भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. यावेळी चित्रपटांच्या Balakot, Surgical Strikes 2.0, and Pulwama Attacks अशा नावांची चर्चा जोरात सुरू होती.

त्यासोबतच विंग कमांडर अभिनंदनना पाकिस्तानी सैन्याने पकडल्याची बातमी आल्यानंतर या घटनेवर वेब सीरीज बनवायची कल्पना पुढे आली होती. असं कळतयं की यावर Abhinandan किंवा Wing Commander Abhinandan अशा नावाने अर्जही आल्याचं कळतंय, असं हफपोस्टने बातमीत म्हटलं आहे.

2016 मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' नावाचा चित्रपट बनवला गेला होता. या चित्रपटाने तमाम भारतीयांची मने जिंकलीच  पण त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. आता भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर साहजिकच सर्व निर्माते चित्रपट बनवण्यासाठी उतावीळ बनले आहेत.

या चित्रपटासाठी नावंही ठरवली आहेत. Pulwama:The Surgical Strike, War Room, Hindustan Hamara Hai, Pulwama Terror Attack, The Attacks of Pulwama, With Love, From India, and ATS-One Man Show. अशी नावं पुढे आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2019 10:26 PM IST

ताज्या बातम्या