सनी लिओन छोट्या पडद्यावरुन देणार 'फिटनेस मंत्रा'

सनी लिओन छोट्या पडद्यावरुन देणार 'फिटनेस मंत्रा'

एक तासाच्या शोमध्ये सनी तीच्या चाहत्यांसाठी फिट आणि निरोगी राहण्यासाठी साधे-सोपे व्यायाम करुन दाखवणार आहे.

  • Share this:

25 आॅक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन आता फिटनेसचा मंत्रा देणार आहे. 'फिट स्टॉप' या टीव्ही शोमध्ये फिटनेस गुरू म्हणून आपल्याला पहायला मिळणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एमटीव्ही बीट्सवर प्रसारित होणाऱ्या या एक तासाच्या शोमध्ये सनी तीच्या चाहत्यांसाठी फिट आणि निरोगी राहण्यासाठी साधे-सोपे व्यायाम करुन दाखवणार आहे.

संगिताला आणि व्यायामाला एकत्र आणण्याचा या शोचा प्रयत्न आहे. सनी म्हणाली की, तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींना आमलात आणणं महत्वाचं आहे.

सगळ्यांनाच आपल्या गडबडीच्या आयुष्यातून व्यायामासाठी थोडाफार वेळ काढला पाहिजे. मला माहित आहे की, व्यायाम घरचं काम करता करता ही होऊ शकतो. त्याला फक्त रोमांचक करण्याची गरज आहे. मी एमटीव्ही बीट्स सोबत 'फिट स्टॉप' लाँच केले आहे. या शोमध्ये मी सगळ्यांना दाखवणार आहे की एखाद्या गाण्यासह कशा पद्धतीने व्यायाम करतात. हा व्यायाम तुमचा चांगलाच घाम काढणार आहे असंही सनी म्हणाली.

'जिस्म 2'च्या अभिनेत्रीच असं म्हणणं आहे की, ती या फिटनेस शोसाठी खूप उत्साही आहे. हा शो सगळ्यात नंबर वन ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 09:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading