10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा

सर्वात मजेशीर तर प्रियांका चोप्रावरचे मीम्स आहे. तर मलायका अरोराला तिच्या या चॅलेंजवरुन लोकांनी ट्रोलही केलं.

News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2019 01:49 PM IST

10 Year Challenge वरही झाले मीम्स, बॉलिवूड सेलिब्रिटींची अशी उडवली थट्टा

मुंबई, २० जानेवारी २०१९- सोशल मीडियावर सध्या #10YearChallenge चांगलंच ट्रेण्डमध्ये आहे. युझर आपले १० वर्षांपूर्वीचा फोटो आणि सध्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यात बॉलिवूड सेलिब्रिटीही काही मागे नाहीत. २००९ मध्ये आपण कसे दिसत होतो आणि आता आपण कसे दिसतो या दोन फोटोंचे कोलाज सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत टाकत आहेत. यात त्यांच्या याच फोटोंवर अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत.राजकुमार राव, करण जोहर, इशा गुप्ता, दीया मिर्झा, मलायका अरोरा, सागरिका घाटगे, अरमान मलिक, डेजी शहा, वीर दास, मिनी माथूर अशा एक ना अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारलं आहे. मलायका अरोराने तर १० ऐवजी २० वर्षांपूर्वीचा फोटो आणि आताचा फोटो शेअर केला. २० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केल्यामुळेही ती ट्रोल झाली होती. युझर्सनी मलायकाचं गणिताचं अज्ञान काढून तिला ट्रोल केलं होतं.


Loading...
एका मीम्समध्ये आलियाचा गली बॉय सिनेमातला हिजाबमधला फोटो आहे तर दुसऱ्या फ्रेममध्ये १० वर्ष जुन्या फोटोच्यास रुपात बजरंगी भाईजान सिनेमातीस बालकलाकार हर्षाली मल्होत्राचा फोटो लावण्यात आला आहे.दुसऱ्या मीम्समध्ये अनिल कपूरच्या नायक सिनेमातील एका सीनचा फोटो दाखवण्यात आला आहे. तर २०१९ मधला फोटो दाखवताना अनिल कपूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे.सर्वात मजेशीर तर प्रियांका चोप्रावरचे मीम्स आहे. २००९ च्या फोटोमध्ये प्रियांका चोप्राने एका तान्ह्या बाळाला हातात घेतले आहे. तर २०१९ मधील फोटोत तिच्या बाजूला ते तान्ह बाळ मोठं होऊन निक जोनस झाल्याचं दाखवलं आहे.

अजून एका मीम्समध्ये २००९ मध्ये रामगोपाल वर्मा यांच्या २६/११ सिनेमाचं पोस्टर आहे. तर २०१९ च्या पोस्टरमध्ये उरी- सर्जिकल स्टाइक सिनेमाचं पोस्टर लावण्यात आलं आहे.

Special Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...