उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतरही अभिनेत्याने दिल्या आदित्यला शुभेच्छा, VIDEO व्हायरल

सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली असतानाही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून विजयी होण्यासाठी या अभिनेत्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 08:04 AM IST

उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतरही अभिनेत्याने दिल्या आदित्यला शुभेच्छा, VIDEO व्हायरल

मुंबई, 16 ऑक्टोबर : एक स्टार आणि बॉलिवूड अभिनेता राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवरून उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली असतानाही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून विजयी होण्यासाठी या अभिनेत्याने शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत रंगल्या होत्या. संजय दत्त 25 ऑगस्टला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार होते, असा दावा रासपाचे प्रमुख आणि मंत्री महादेव जानकर यांनी केला होता. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महादेव जानकर यांना सामना संपादकीयमधून टोला हाणला होता. परंतू तरीदेखील संजय दत्त याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? संजय दत्त हे जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वगैरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खोचक टोला हाणला होता. पण यानंतरही संजय दत्त याने आदित्य ठाकरे यांना विधानसभेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाला संजय दत्त....

'आदित्य ठाकरे माझ्यासाठी लहान भावासारखा आहे. तो मोठे साहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातून आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप मदत केली आहे. ते माझ्या वडिलांसारखे आहेत. मी त्यांना कधी विसरू शकणार नाही. उद्धव ठाकरेही समान आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आदित्य चांगल्या मतांनी निवडून येणार. कारण आम्हाला तरुण लिडरची गरज आहे. आदित्यला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र!'

इतर बातम्या - मोदींनी शेतकऱ्यांचे पैसे उद्योगपतींच्या खात्यात टाकले, काँग्रेस नेत्याची टीका

Loading...

अभिनेता संजय दत्त हे पुढील महिन्यात ‘रासपा’त प्रवेश करणार - सामनातून टीका

- राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष नामदार महादेव जानकर यांनी आता सांगितले आहे की, अभिनेता संजय दत्त हे पुढील महिन्यात ‘रासपा’त प्रवेश करणार आहेत. इतकेच नव्हे तर दत्त महाशय हे जानकर पक्षाचा जोरदार प्रचारही करणार आहेत.

- ‘संजय दत्त प्रवेश करणार’ या जानकरी दाव्याने मात्र करमणूक झाली आहे. मेळावा धनगर समाजाचा होता व धनगरांच्या अनेक रखडलेल्या प्रश्नांना वाचा फुटेल असे वाटले होते, पण मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली.

- महाराष्ट्रातील धनगर समाजातील अस्वस्थता यानिमित्ताने दिसून आली. सरकारने धनगर बांधवांसाठी अनेक योजना जाहीर गेल्या, त्या आजही कागदावरच आहेत. धनगर समाजाला मेंढी-पालनासाठी जागा आणि जागा खरेदीसाठी 70 कोटी अनुदानाची घोषणा केली. नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे धनगर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना जाहीर केली व त्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील किती वसतिगृहांचे कार्य सुरू झाले?

- धनगर समाजास घरे, नोकऱया, प्रशिक्षण, चराई अनुदान वगैरेच्या योजना जाहीर झाल्या. या योजनांना गती देण्यासाठी महादेव जानकरांनी सरकारात जोर लावायलाच हवा. जानकर असेही म्हणाले की, त्यांचा पक्ष ‘कमळ’ चिन्हावर लढणार नाही. ते सगळे ठीक असले तरी गेली पाच वर्षे त्यांच्या पक्षाचा ‘भुंगा’ हा कमळ फुलाभोवती पिंगा घालत आहे.

इतर बातम्या - मुंबई: वरळीत मतांसाठी आदित्य ठाकरेंना घ्यावा लागला लुंगीचा आधार

- फूल, मग ते कुठलेही असो आणि भुंगा यांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही. मात्र तरीही जानकर बोलले. आता हादेखील एक ‘सौम्य विनोद’ आहे असे कोणी समजू नये. मुळात धनगर समाजाची आरक्षणाची पूर्ण न झालेली मागणी हा खरे म्हणजे त्या समाजासाठी सगळ्यात ज्वलंत विषय आहे. हे आरक्षण देण्याचे आश्वासनदेखील हवेतच विरले आहे.

- आता संजय दत्त यांनी पक्षप्रवेश केल्याने धनगर समाजाचे सर्व प्रश्न सुटणार असतील तर त्यांच्या हाती काठी आणि घोंगडे द्यायलाच हवे. मुळात मुख्य प्रश्न असा आहे की, धनगर समाजाच्या तरुणांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

- 2014 साली बारामतीत झालेल्या आंदोलनापासून अलीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी नगर जिल्ह्यातील ‘चौंढी’ येथे धनगर तरुणांनी आंदोलन केले. या आंदोलनात भाग घेतलेल्या असंख्य तरुणांवर गुन्हे आणि खटले दाखल झाले. यात अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्या. या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला होता, पण शब्द देऊनही धनगर समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यावर जानकरांचे काय उत्तर आहे?

इतर बातम्या - अमित शहांसोबत झालेल्या बैठकीवर सौरभ गांगुलीने केला पहिल्यांदाच खुलासा!

- धनगर समाजातील किती आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले व मागे घेतले नसतील तर त्यामागचे झारीतील शुक्राचार्य कोण हे समजणे गरजेचे आहे.

- सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? संजय दत्त हे जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वगैरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे. विनोदाची टवाळी होऊ नये इतकेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 08:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...