मुंबई 22 फेब्रुवारी : आलिया भट्टने आपल्या इन्स्टाग्रामवर असं पोस्ट केलं आहे की 'कदाचित मला खूप आनंदामुळे चक्कर येऊ शकते'. तिच्या या उत्साहाचं आणि आनंदाचं कारणही तसंच आहे. तिची आणि जगभरातील लाखो प्रेक्षकांची आवडत्या F.R.I.E.N.D.S सिरीजचं रियुनियन होणार आहे. चँडलर, मोनिका, जोइ, फिबी, रॉस आणि रेचल या मित्रांची टोळी पुन्हा एकदा एका एपिसोडसाठी तुम्हाला हसवण्यासाठी येणार आहे. त्यामुळेच आलियाला देखील आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
1994 ते 2014 या दहा वर्षांमध्ये प्रेक्षकांच्या मनाव F.R.I.E.N.D.S या मालिकेने अधिराज्य केलं. जवळपास 2 पिढ्या ही मालिका आवडीने पाहत असतात. F.R.I.E.N.D.S या मालिकेचा रियुनियनचा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. या एका भागासाठी या मालिकेती जे मुख्य 6 कलाकार आहेत, त्यांना मिळणारी रक्कम वाचून तुम्ही थक्क व्हाल. जेनिफर अनिस्टन, कर्टनी कॉक्स, लिसा कुद्रो, मॅट ले-ब्लँक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्विमर या सहा कलाकारांना प्रत्येकी 2.5 मिलियन डॉलर एवढी रक्कम एका एपिसोडसाठी मिळणार आहे. अशी माहिती variety.com कडून देण्यात आली आहे. हा रियुनयन एपिसोड अनस्क्रिप्डेड असणार आहे.
(हेही वाचा-कियारा अडवाणीच्या TOPLESS फोटोमागचं गुपित, आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल)
पंधरा वर्षांपूर्वी या सिरीजचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला होता. सप्टेंबर 1994 ते मे 2004 पर्यंत ही सिरीज जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होती. काही काळासाठी ही सिरीज नेटफ्लिक्सवर सुद्धा होती. मिळालेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्सवर ही सिरीज सर्वात जास्त पाहण्यात आली. HBO Max वर हा रियुनयचा एपिसोड प्रसारित होणार आहे. त्याचप्रमाणे F.R.I.E.N.D.S चे सर्व 236 एपिसोड्स HBO Max स्ट्रीमिंगवर उपलब्ध असणार आहेत.
View this post on InstagramIt’s happening….. @HBOMax @jenniferaniston @courteneycoxofficial @lisakudrow @mleblanc @_schwim_
F.R.I.E.N.D.S सिरीजमधील 6 मुख्य कलाकारांनी ही बातमी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये त्या सर्वांनी Its Happening असं कॅप्शन दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.