श्रीदेवींचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच, IPS अधिकाऱ्याचा पुराव्यासकट दावा

श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा ऋषिराज सिंह यांनी केला आहे. ऋषिराज सिंह यांनी त्यांचा सहकारी डॉ. उमादथन भारत यांच्या हवाल्यातून हा दावा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 01:05 PM IST

श्रीदेवींचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच, IPS अधिकाऱ्याचा पुराव्यासकट दावा

मुंबई, 12 जुलै : केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल जीडीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा ऋषिराज सिंह यांनी केला आहे. ऋषिराज सिंह यांनी त्यांचा सहकारी डॉ. उमादथन भारत यांच्या हवाल्यातून हा दावा केला आहे. डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन होते. गुन्हेगारी घटना आणि विशेषत: खूनी रहस्य सोडवण्यात ते तरबेज होते. ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांना श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नाही तर त्यांची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे. त्याबद्दल बोलताना ऋषिराज सिंह म्हणाले की, 'मी उमादथनशी श्रीदेवी यांच्या हत्येबद्दल बोलत होतो. तेव्हा त्यांनी मला धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी श्रीदेवींच्या हत्येचा जवळून अभ्यास केला आहे. या तपासावेळी अशा काही घटना समोर आल्या ज्यातून स्पष्ट होतं की श्रीदेवी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यासंबंधी अनेक पुरावेदेखील आहेत.'

ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांच्या निधनानंतर लेख लिहिताना श्रीदेवींच्या मृत्यूचा केला खुलासा

खरंतर ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यावर एक लेख लिहिला होता. त्या लेखात त्यांनी श्रीदेवींच्या हत्येचा खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी लिहलेल्या लेखानुसार, 'कोणतीही व्यक्ती दारुच्या नशेत एका छोट्या बाथटबमध्ये बुडून मरू शकत नाही.'

24 फेब्रुवारी 2018ला दुबईच्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. लग्नसमारंभात श्रीदेवींनी अतीमद्यपान केलं होतं. त्यानंतर त्या बाथरूमध्ये गेल्या तोल जाऊन पडल्या. पडल्यामुळं त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा मृत्यू अपघाती असल्याचं सांगण्यात आलं होतं.

Loading...

श्रीदेवींच्या मृत्यूवेळी खोलीत आणखी कोणी होतं?

ऋषिराज सिंह यांनी लिहलेल्या लेखानुसार, 'कोणाचाही एखाद्या बाथटबमध्ये बुडून मृत्यू होईल हे शक्य नाही. मुळात बाथटबमध्ये बुडूनं शक्य नाही. कारण त्या बाथटबमध्ये अगदी फिट बसत होत्या. त्यांनी दावा केली की, श्रीदेवींचे दोन्ही पाय पकडले होते आणि त्यानंतर त्यांचं डोकं पाण्यात घालून त्यांना मारण्यात आलं.' ऋषिराज सिंह यांनी लेखातून केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : नराधम दिराकडून लहान भावाच्या बायकोवर बलात्कार, मुंबईजवळील घटनेनं खळबळ

श्रीदेवींचा संशयास्पद मृत्यू पण पुराव्यांअभावी अद्याप कारण अस्पष्ट

श्रीदेवी 2-3 दिवस रूममधून बाहेर आल्या नव्हत्या तर त्यांना सोडून बोनी कपूर भारतात का परतला असा सवाल दुबई सरकारनं बोनी यांना विचारला होता. त्यावेळी संशयाची सुई बोनी कपूर यांच्यावर होती. पण त्यावेळी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्यांचा अपघाती मृत्यू झाला असं सांगण्यात आलं आणि ते प्रकरण तिथेच बंद करण्यात आलं.

दरम्यान, ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांच्या हवाल्याने केलेल्या दाव्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू नाही तर त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यावर पुन्हा काही तपास होणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

VIDEO: जगबुडीचं रौद्र रूप! मुसळधार पावसामुळे नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...