मुंबई, 27 जानेवारी : सध्या बॉलिवूड स्टार्स त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंट्समुळे जास्त चर्चेत असतात. सध्या सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणजेच संजू बाबा सोशल मीडियावर भन्नाट ट्रोल झाला आहे. त्याने मुलीसोबत शेअर केलेल्या फोटोमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
संजू बाबाने 'नेशनल गर्ल चाइल्ड डे'वर मुलीसोबतचा फोटो शेअर केला आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. यावर संजू बाबाच्या चाहत्यांना प्रचंड राग आला कारण त्याने फक्त लहान मुलीसोबत फोटो शेअर केला. त्यात त्याची मोठी मुलगी त्रिशलाचा काहीही उल्लेख नाही केला.
बस्सं...या कारणामुळे संजय दत्तचे फॉलोअर्स प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स करून संजू बाबाला सोशल मीडियावर ट्रोल केलं. चाहत्यांनी संजूवर दोन मुलींमध्ये भेदभाव केल्याचा आरोप लगावला आहे. 'कदाचित, तुम्ही विसरलात की तुमच्या 2 मुली आहेत' अशा काहीशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या.
खरंतर, त्रिशाला संजय दत्त आणि त्यांची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्रिशाला भारतात नाही तर तिच्या आजी-आजोबांसोबत अमेरिकेत राहते. त्यामुळे चाहत्यांनी संजू बाबा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं आहे.