#GullyBoyTrailer : आता रणवीर सिंगचीही येणार वेळ

#GullyBoyTrailer : आता रणवीर सिंगचीही येणार वेळ

रणवार सिंगचा आगामी चित्रपट गली बॉयचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. रणवीर सिंगचा झोपडपट्टीतील अंदाज लोकांना प्रचंड आवडला आहे. येत्या 14 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जानेवारी : रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा 'गली बाॅयचं' ट्रेलर नुकताच रिलीज झालं आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधून सिनेमाची कथा स्पष्ट होत आहे. गली बॉईज सिनेमात रणवीर एका हिप हॉप गायकाची भूमिका साकारतो आहे. हिप हॉप गाण्याबद्दल असलेलं रणवीरचं वेडेपण सिनेमात दिसून येत आहे. यात रणवीर सिंग एका झोपडपट्टीत राहत असतो आणि त्याला रॅप साँग गात त्यातच त्याला करियरही करायचं आहे पण त्याची परिस्थितीसोबत असलेली तडझोड चित्रपटात दिसून येत आहे.

रणवीर सिंगसोबतच सिनेमात आलिया भट्ट आणि कल्की कोचिन आहे. त्याचबरोबर मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषसुद्धा सिनेमात रणवीरच्या आईची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरने केलं असून सिनेमाची निर्मिती फरहान अख्तरने केली आहे.

येत्या 14 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'गली बाॅय' बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी निवडला गेलाय. 7  ते 17 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिव्हल होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading