हिमेश रेशमियानं शेअर केला रानू मंडलच्या तिसऱ्या गाण्याचा VIDEO, स्टाईल पाहून व्हाल थक्क!

हिमेश रेशमियानं शेअर केला रानू मंडलच्या तिसऱ्या गाण्याचा VIDEO, स्टाईल पाहून व्हाल थक्क!

'तेरी मेरी कहानी' आणि 'आदत' या गाण्याच्या रेकॉर्डींगनंतर हिमेशने आता रानूच्या तिसर्‍या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या नवीन गाण्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे रानूंची स्टाईल.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या रानू बद्दल सर्वांनाच माहिती आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल एका व्हायरल व्हिडिओमुळे आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं. हिमेश रेशमियाने रानू यांच्या तिसऱ्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रानूचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतो.

'तेरी मेरी कहानी' आणि 'आदत' या गाण्याच्या रेकॉर्डींगनंतर हिमेशने आता रानूच्या तिसर्‍या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या नवीन गाण्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे रानूंची स्टाईल. यावेळी रानू अधिक आत्मविश्वासानं गाताना दिसत आहेत. हिमेश त्यांच्या शेजारी उभा राहून गाण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडिओमधलं रानूचं हास्य सगळ्यांना भूरळ घालणारं आहे.

हे गाणं शेअर करताना हिमेश रेशमियाने लिहिले की, ''आशिकी मे तेरी 'या आगामी गाण्याची ही झलक आहे. रानूजींची अष्टपैलुत्व आणि त्यांचा आत्मविश्वास प्रत्येक गाण्यात वाढत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणल्याबद्दल सर्वांचे आभार. ' हे गाणं 13 वर्षांपूर्वी 2006 मध्ये रिलीज झालेल्या '36 चायना टाऊन' सिनेमाच्या 'आशिकी मे तेरी' या गाण्याचे रिमेक आहे.

इतर बातम्या - मुंबईसह उपनगर, ठाणे परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू, सखल भागांत साचलं पाणी

सलमान-रानूच्या भेटीनंतर हा VIDEO आला समोर

रानू मंडल यांनी सलमानच्या भेटीचं वृत्त फेटाळलं असलं तरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये त्या सलमानला भेटल्याचं दिसतं. मात्र हा सलमान खान नाही तर सलमान अली आहे. रानू मंडल यांचा चाहता वर्ग काही दिवसातच एवढा वाढला आहे की, प्रत्येकजण त्यांना भेटू इच्छितो. नुकतीच इंडियन आयडॉल सलमान अलीनं त्यांची भेट घेतली. यावेळचा एक व्हिडीओ त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात रानू यांचं ‘तेरी मेरी’ हे गाणं बॅकग्राउंला वाजताना दिसणार आहे तर रानू यावर लिपसिंक करताना दिसत आहेत आणि सलमान त्यांच्या बाजूला उभा राहून त्यांचं कौतुक करत आहे.

इतर बातम्या - 'मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही' अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

सलमान अलीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. सलमानच्या या पोस्टचं सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. मात्र या दरम्यान काही लोकांनी पुन्हा एकदा बॉलिवूडला निशाणा केला आहे. एका युजरनं लिहिलं, आता त्या प्रसिद्ध झाल्यावर सर्वजण त्यांना विचारत आहेत. नाहीतर कोणी पाहिलंही नसतं. तर दुसऱ्या एका युजरनं विचारलं हे गाणं एवढंच आहे की, याच्या पुढेही काही आहे.

इतर बातम्या - पत्नीला इंप्रेस करण्यासाठी 5 टास्क देऊन करायला लावला 'Romance'

रानू यांची वेगवेगळी नावं...!

आपल्या जादुई आवाजानं सर्वांना वेड लावणारी रानू मूळची पश्चिम बंगालच्या राणाघाटमधील राहणारी आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार रानूचं खरं नाव रेनू रे आहे. तर काही रिपोर्ट नुसार ती ज्यावेळी क्लबमध्ये गाणी गात असे त्यावेळी तिचं नाव बॉबी होतं. पुढे बबलू मंडल यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचं नाव रानू मंडल झाल्याचं म्हटलं जात आहे.

SPECIAL REPORT: अब्दुल सत्तारांमुळे शिवसेनेचं बळ वाढणार?

Published by: Renuka Dhaybar
First published: September 3, 2019, 9:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading