रानू मंडलच्या मुलीने केला मोठा खुलासा, आईविषयी पहिल्यांदाच बोलली...!

रानू मंडलच्या मुलीने केला मोठा खुलासा, आईविषयी पहिल्यांदाच बोलली...!

रानू मंडल जेव्हा जगभरात प्रसिद्ध झाल्या तेव्हा 10 वर्षांनंतर आईपासून दूर राहणारी त्यांची मुलगी परत आली. सोशल मीडियावरून तिच्या अनेक टीका करण्यात आल्या.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या रानू बद्दल सर्वांनाच माहिती आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल एका व्हायरल व्हिडिओमुळे आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. एका रात्रीत रानू यांचं आयुष्य बदललं. त्यांना सिनेमात गाण्य़ाची संधी मिळाली. त्या स्टार झाल्या. जेव्हा त्या जगभरात प्रसिद्ध झाल्या तेव्हा 10 वर्षांनंतर आईपासून दूर राहणारी त्यांची मुलगी परत आली. सोशल मीडियावरून तिच्या अनेक टीका करण्यात आल्या. त्या सगळ्यावर पहिल्यांदा रानू यांच्या मुलीने मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे.

रानू यांच्या मुलीचं नाव एलिझाबेथ साथीरॉय आहे. एलिझाबेथने नुकतंच एका वृत्तवाहिणीला तिच्या आणि आईच्या नात्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. एलिझाबेथ म्हणाली की, 'मला माहित नव्हतं की, माझी आई रेल्वे स्टेशनवर गाणं गाते. कारण, माझी आणि तिची जास्त भेट होऊ शकत नव्हती. मी काही महिन्यांपूर्वी कोलकाताच्या धरमशाळा इथे गेले होते. तिथं मी माझ्या आईला एका स्टँडवर बसलेलं पाहिलं. मी ताबडतोब तिच्याकडे गेले आणि तिला मी 200 रुपये दिले आणि घरी जाण्यासाठी सांगितलं.

एलिझाबेथवर सोशल मीडियातून आरोप

सोशल मीडियावरून एलिझाबेथवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. तिने कठीण काळात आईला एकटं सोडलं. अशा टीका तिच्यावर करण्यात येत आहेत. पण 'आईच्या 4 मुलांपैकी मी एकटीच होते जी सतत तिची काळजी घेते होते' असं एलिझाबेथ म्हणाली आहे.

'मी आईला 500 रुपये पाठवायचे'

'मी एका काकाच्या खात्यातून 500 रुपये आईला पाठवत होते. माझा घटस्फोट झाला आणि मी सूरी इथे एक लहान दुकान चालवते. मी एकटी आहे आणि मला 9 वर्षाच्या एक मुलगा आहे. त्याला सांभाळण्याची जबाबदारी माझ्य़ावर असते. माझ्या आयुष्यातही खूप संघर्ष आहे.' असं एलिझाबेथ म्हणाली आहे.

मी आता कुठे जावू?

एलिझाबेथ म्हणाली की, 'मी आईबरोबर राहण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला पण तिने सोबत रहाण्यास नकार दिला. असं असूनही, लोक मला दोष देत आहेत. आता जनता माझ्याविरूद्ध आहे तर मी कुठं जावं?

रानू मंडल यांची चार मुलं आहेत

रानू यांच्या कुटूंबाबद्दल बोलताना एलिझाबेथ म्हणाली की, आईची दोन लग्न झाली आहेत. तिला 2 लग्नापासून 4 मुलं आहे. मी तिच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे. आईच्या दुसऱ्या लग्नापासून जी 2 मुलं आहेत ती कदाचित मुंबईत राहतात. तर आईला दुसरा नवरा अजून जिवंत असल्य़ाचंही एलिझाबेथ म्हणाली. तर आम्ही चारही भावंड एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं रानूने सांगितलं.

कुठे आहेत रानू मंडल यांची मुलं ?

आईची दुसरी मुलं त्यांची जबाबदारी घेत नाहीत मग लोक त्यांच्यावर टीका का नाही करत असा सवालही एलिझाबेथ हीनं उपस्थित केला. तर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आईची काळजी घेतली पाहिजे अशी माझी इच्छा असल्याचं एलिझाबेथ म्हणाली.

TikTokसाठी काही पण! तरुणानं VIDEO शूट करण्यासाठी जीप दिली पेटवून

First published: September 3, 2019, 1:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading