आलिया सोबत रिलेशनशिपवर रणबीर म्हणतो...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2018 10:17 PM IST

आलिया सोबत रिलेशनशिपवर रणबीर म्हणतो...

15 जून : गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या अफेयरची चर्चा आहे. 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात पहिल्यांदाच ही जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या रिलेशनशीपची आजकाल चर्चा आहे. करण जोहरच्या आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र'मध्ये ही जोडी सोबत दिसणार आहे. सिनेमाचं शूटिंग सुरू झाल्यापासूनच दोघांमध्ये खूप चांगली मैत्री असल्याची चर्चा होती. यानंतर बऱ्याच अन्य प्रसंगी दोघांना सोबत बघितल्यानंतर असंही म्हटलं गेलं की, हे नातं मैत्रीच्या पलिकडचं आहे. सीएनएन न्यूज18 च्या राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आपल्या आणि आलियाच्या रिलेशन बद्दल एक नवीन खुलासा केलाय.

राजीव मसंद यांच्यासोबतच्या गप्पांमध्ये रणबीर म्हणाला, "आलियाचा माझ्या जीवनावर बराच सकारात्मक प्रभाव राहिला आहे. तिची अभिनेत्री म्हणून खूप स्तुती करतो. ती खूप मेहनत करते आणि खूप शिस्तीने काम करते."

प्रेमाविषयी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला की, जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो तेव्हा तो काही अद्भूत काम करतो. प्रेमात असणं ही स्वत:मधेच एक सुंदर गोष्ट आहे.

Loading...

आपल्या आणि आलियाविषयी बोलताना रणबीरने हा खुलासाही केला की, आम्ही दोघेही प्राणीप्रेमी आहेत. बऱ्याचदा या दोघांना आपापल्या पाळीव प्राण्यांसोबत फोटो शेयर करताना पाहिलं गेलं आहे.

तसंच रिलीज होणारा आपला नवीन सिनेमा 'संजू' बद्दल रणबीर म्हणाला, "हा सिनेमा कसा असेल याबद्दल आता बोलणे चुकीचे ठरेल, लवकरच सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतीलच"

राजकुमार हिरानीद्वारा दिग्दर्शित 'संजू' हा सिनेमा संजय दत्त याच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. हा सिनेमा 29 जूनला चित्रपटगृहात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...