रजनीकांतच्या 'या' सच्चा चाहत्याने 2 किलो मीटर पाठलाग करत पकडला चोर

रजनीकांतच्या 'या' सच्चा चाहत्याने 2 किलो मीटर पाठलाग करत पकडला चोर

सगळ्यांचा आवडता सुपरस्टार रजनीकांत नेहमीच प्रतेकाच्या मदतीला धावून येतात. त्याप्रमाणेच त्यांचा फॅन क्लबही तसाच आहे.

  • Share this:

16 जुलै : सगळ्यांचा आवडता सुपरस्टार रजनीकांत नेहमीच प्रतेकाच्या मदतीला धावून येतात. त्याप्रमाणेच त्यांचा फॅन क्लबही तसाच आहे. रजनीकांतचे चाहते नादार हे देखील रजनीकांत यांच्या पावलावर पाय टाकत सगळ्यांची मदत करतात. याआधीही नादार यांच्या मुलांनी आपला जीव धोक्यात टाकत अनेकांना मदत केली आहे आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे.

ते झालं असं की, खालसा कॉलेजच्या उपमुख्याध्यापक डॉ. देवेंद्र कोर भासीन यांच्या हातातून बॅग खेचून चोर पळून जात होता.

सुधाकर नादार हे आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत होते. सुधाकर संमुखण्ड हॉल जवळ असताना तिथे २ व्यक्ती बाईकवर संशयितपणे फिरत होते.

त्यांनी थोडं पुढे जाऊन बघितल तेव्हा त्यांनी एका महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यांचा लक्षात आल की नक्कीच हा साखळीचोर असणार.

नादार त्याचा पाठलाग करू लागले, पाठलाग करत असताना एका पोलिसाने त्यांना पहिलं. नादारने त्या चोराला पकडल त्याच वेळी पोलीसही तिथे पोहोचले आणि त्या चोराला अटक केली.

पोलीस चौकशीत सुरूवातीला आरोपीने चोरीची कबुली देण्यास नकार दिला पण नंतर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. संगम नगरमध्ये राहणाऱ्या या 2 अल्पवयीन मुलांना चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. त्यानंतर नादार यांनी ७ हजार रुपये आणि त्यात नवीन मोबाईल असलेली देवेंद्र भसीन यांची बॅग त्यांच्याकडे सुखरूप आणून दिली.

First published: July 16, 2018, 1:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading