मुंबई,ता.28 जून : भारतात सुटीवर आलेल्या प्रियंका चोप्राने बुधवारी आकाश अंबानीच्या मेहेंदी कार्यक्रमात आणि प्री-एंगेजमेंट पार्टीत हजेरी लावली आणि त्याचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला.
या कार्यक्रमसाठी प्रियंकाने खास साडी नेसली होती. आकाश आणि श्लोका मेहेतासोबतचा फोटो शेअर करत प्रियंकाने त्यांना शुभेच्छाही दिल्या आहे. डिसेंबर महिन्यात आकाश आणि श्लोकाचं लग्न होणार आहे. प्रियंकाबरोबरच या कार्यक्रमाला बॉलिवूडमधलं स्टारकास्ट उपस्थित होतं.
कोण आहे श्लोका मेहेता?
श्लोका ही आकाशची बालपणाची मैत्रीण आहे. मुंबईतल्या धिरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून तिचं सुरवातीचं शिक्षण झालं. नंतर तिनं प्रिंस्टन युनिव्हर्सिटीमधून एंथ्रोपॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. लंडन स्कूल ऑफ ईकॉनॉमिक्समध्येही तिनं उच्च शिक्षण घेतलं आहे. तसेच कनेक्ट फॉर या स्वयंसेवी संस्थेचीही ती सहसंस्थापक आहे.
हेही वाचा...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akash Ambani, Bollywood, Pre-engagement party, Priyanka chopra, Shloka mehta बॉलीवूड, आकाश अंबानी, निक जोनस, प्रियंका चोप्रा, मुंबई, श्लोका मेहेता