बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. नेहाने मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी नेहा आणि अंगदला खार येथील एका क्लिनिकच्या बाहेर पाहण्यात आले होते. आज सकाळी ११ वाजता चिमुकलीचा जन्म झाला असून नेहाची तब्येतही चांगली आहे. सध्या अंगद आणि नेहाच्या घरी जल्लोषाचं वातावरण असून दोन्ही घरात नव्या पाहुण्याच्या तयारीला जय्यत सुरूवात झाली आहे.
अंगदने एका मुलाखतीत नेहा लग्नाआधी गरोदर असल्याचा खुलासा केला होता. याच कारणामुळे दोघांना घाईत लग्न करावं लागल्याचं अंगदने सांगितलं. अचानकमध्ये जरी लग्न करावं लागलं तरी दोघांनी चांगली तयारी केली होती. दोघांनी शिख पद्धतीने लग्न केले होते. १० मे २०१८ ल दिल्लीतील एका गुरूवारात दोघांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाची बातमी कोणालाच माहित नव्हती. दोघांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले तेव्हा साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
नेहाने ती गरोदर असल्याचे जवळपास ४ ते ५ महिने लपवून ठेवले होते. मी गरोदर असल्याचे कळले तर मला कोणी काम देणार नाही आणि माझ्याबद्दल चुकीची मतं बनवतील, अशी तिला भिती वाटत होती. यामुळेच तिने याबद्दल कोणालाही सांगितलं नाही असे स्पष्टीकरण दिले.
VIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा