संस्कारी बापू अलोक नाथ यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलांची संख्या वाढली!

संस्कारी बापू अलोक नाथ यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलांची संख्या वाढली!

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर, कंगना राणावत-विकास बहल यांच्यानंतर मी टू प्रकरणात अजून एक मोठं नाव पुढे आलं ते म्हणजे संस्कारी बापू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलोक नाथ यांचं.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : तनुश्री दत्ता-नाना पाटेकर, कंगना राणावत-विकास बहल यांच्यानंतर मी टू प्रकरणात अजून एक मोठं नाव पुढे आलं ते म्हणजे संस्कारी बापू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलोक नाथ यांचं. अलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलांची संख्या वाढायला लागली आहे.

सगळ्यात आधी 'तारा' मालिकेच्या निर्मात्या विनीता नंदा यांनी अलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नवनीत नंदा या अभिनेत्रीने अलोक नाथ यांच्यावर याच मालिकेच्या शूटिंग दरम्यान लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

एवढं कमी होतं की काय म्हणून अभिनेत्री संध्या मृदूल हिनेही एका हिंदी मालिकेच्या शूटिंग दरम्यान अलोक नाथ यांनी आपल्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. यावेळी घाबरून आपण आपल्या हेअर ड्रेसरला आपल्या खोलीत झोपायला सांगितलं होतं.

तर शुटिंग दरम्यान रिमा लागू यांनी आपल्याला अलोक नाथ यांच्यापासून लांब ठेवलं होतं असं तीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हंटलंय. मात्र या घटनेनंतर अलोक नाथ यांच्या वकिलांनी या महिलांना कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला फोटोग्राफरच्या आरोपांनंतर अडचणीत आलेला गायक कैलाश खेरवर पार्श्वगायिका सोना मोहपात्रानं देखील गंभीर आरोप केले आहेत. एका कार्यक्रमानिमित्त झालेल्या भेटीदरम्यान कैलाश खेरनं मांडीवर हात ठेवला. या घटनेनंतर मी तडकन निघून गेले अशी धक्कादायक माहिती सोना मोहपात्रानं ट्विटरवर शेअर केलीय.

एवढंच नव्हे तर नकार दिल्यानंतरही कैलाश खेरनं फोन करून संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न केला, तसंच कार्यक्रमाआधी घरी येण्याचा आग्रह धरला असे गंभीर आरोप सोना मोहपत्रानं केले आहेत. दरम्यान सोना मोहपात्राच्या आरोपांवर कैलाश खेरनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

VIDEO: लायसन्स मागितलं म्हणून रिक्षा चालकाने महिला पोलिसाला फरफटत नेलं!

<iframe class="video-iframe-bg-color" onload="resizeIframe(this)" id="story-309338" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzA5MzM4/"></iframe>

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 07:49 AM IST

ताज्या बातम्या