मुंबई, 22 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) याना मुंबई पोलिसांनी बुधवारी नोटीस धाडली आहे. मुबंई पोलिसांनी दोघींना चौकशीसाठी बोलावले आहे. देशद्रोहाच्या आरोपांप्रकरणी कंगना रणौतला सोमवारी चौकशीसाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर रहावं लागणार लागणार आहे. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना रणौत हिच्यासह तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अभिनेत्री कंगना तिच्या भावाच्या लग्नात आनंद साजरा करत असतानाच तिला ही नोटीस मिळाली आहे. यावेळी देखील तिने तिच्या अंदाजात उत्तर दिले आहे. तिने मुंबई पोलिसांना 'महाराष्ट्राचे पप्पू' म्हटले आहे. कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना उत्तर दिले आहे.
धक्कादायक: दिवसा-ढवळ्या अभिनेत्याची हत्या; शरीरावर आढळले चाकूचे वार
मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीला समन जारी करून पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यांनतर तिने ट्वीट करून असे म्हटले आहे की, 'वेडसर झालेली पेंगविन सेना, महाराष्ट्राच्या पप्पूनो.. खूप आठवण येते आहे क-क-क-क-क कंगनाची, काही हरकत नाही लवकरच परत येईन.'
Obsessed penguin Sena ... Pappupro of Maharashtra, bahut yaad aati hai k-k-k-k-k-Kangana, koi baat nahin jaldi aa jaungi .... https://t.co/nwLyoq1J2i
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 21, 2020
बॉलिवूडचे कास्टिंग डायरेक्टर आणि 'फिटनेस ट्रेनर' मुनव्वर अली सय्यद यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याची दखल घेत कोर्टाने कंगनाविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होत.
क्रिस गेलची लकी चार्म आहे 'ही' फॅशन डिजायनर! सोशल मीडियावर PHOTO VIRAL
पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, न्यायायलाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगनाविरोधात भादवी कलम कलम 153 ए (धर्म, वंश इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये कलह वाढवणे), 295 ए (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतुपुरस्सर कृत्य) आणि 124-ए (देशद्रोह) आणि 34 अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या दोन्ही बहिणींना सोमवारी किंवा मंगळवारी चौकशिकरता हजर राहावे लागणार आहे.