मुंबईचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदेने गळफास लावून केली आत्महत्या

मुंबईचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदेने गळफास लावून केली आत्महत्या

बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी घरातल्या पंख्याला गळफास घेऊन अभिजीतने आत्महत्या केली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी घरातल्या पंख्याला गळफास घेऊन अभिजीतने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी अभिजीतने एक चिठ्ठीही लिहली होती. त्यात त्याने त्याच्या बँकेचे अकाऊंट आपल्या मुलीच्या नावे केलं असल्याचं लिहलं आहे. याबद्दलची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी ती चिठ्ठी आणि अभिजीतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यामुळे आत्महत्येच्या बाजून पोलीस आता या प्रकरणाता तपास करत आहे.

अभिजीत शिंदेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्या समवेत अनेत दिग्गजांसोबत काम केलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की, बुधवारी सकाळी घरातल्या सीलिंग पंख्याला लटकून अभिजीने आत्महत्या केली आहे. त्याच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याने हा सगळा प्रकार आजूबाजूच्यांच्या लक्षात आला. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. अभिजीतला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

अटलजींच्या श्रद्धांजली सभेत मंत्र्यांचा निर्लज्जपणा, व्यासपीठावरच हास्याचे फवारे

आपल्या मुलीला भेटणे शक्य नसल्याचे डिप्रेशन :

प्रसिद्ध डान्सर आमि रॅपर अभिजीत शिंदेची पत्नी त्याला सोडून गेल्यामुळे तो मोठ्या डिप्रेशनमध्ये होता. गेल्या तीन महिन्यांपासून अभिजीत बायको तिच्या आईकडे राहते. अभिजीतला 3 महिन्याची मुलगी आहे आणि पण मुलीला भेटण्यासाठी त्याच्या बायकोने त्याला सक्त नकार दिला आहे. त्यामुळे तो खूप डिप्रेशनमध्ये होता. तर दुसरीकडे हाती कोणतंही काम नसल्याने त्याला पैशांचेही टेन्शन होते आणि याच सगळ्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, पोलिसांनी अभिजीतचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरून हाती लागलेल्या सुसाईड नोटचाही पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात अभिजीतची पत्नी आणि स्थानिकांचीही पोलीस चौकशी करण्यात येणार आहे.

 

'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

First published: August 23, 2018, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading