अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात शिरलं पाणी, समोर आला असा VIDEO

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात शिरलं पाणी, समोर आला असा VIDEO

अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर पाणी साचल्याचा हा व्हिडिओ एका नेटकऱ्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर : मुंबईत 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मोठी कोंडी झाली. अनेक ठिकाणी पाणी साठून राहिलं. सामान्य जनतेच्या या पावसाने चांगलेच हाल झाले. याचवेळी बॉलिवूड स्टार अमिताब बच्चन यांच्या घराबाहेरदेखील पाणी साचलं होतं. विशेष म्हणजे घराबाहेर इतकं पाणी साचलं की पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. घरात पाणी भरल्यानंतर कोणतीही अडचण होऊ नये यासाठी अमिताभ बच्चन यांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नुकताच अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बींच्या घराबाहेर मोठं तलाव झाल्याचं पाहायला मिळालं.

अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर पाणी साचल्याचा हा व्हिडिओ एका नेटकऱ्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमिताभ यांच्या जुन्या प्रतिक्षा या बंगल्याबाहेर पावसाच्या पाण्याने तळं साचलं आहे. त्यांच्या घरातही पाणी शिरलं असल्याचा अंदाज आहे असं हा व्हिडिओद्वारे लिहण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने बिग बींच्या घरासमोर पाणी साचलं आहे. लोकांच्या कंबरेइतकं पाणी साचलं आहे.

बॉलिवूडच्या इतर अनेक स्टार्सनीही मुंबईतील पाण्याची भीषणता दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेता अर्जुन रामपालनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक कार पाण्याखाली गेली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अर्जुन रामपालने लिहिलं की, 'फक्त भारतीय गाड्याच मुंबईच्या पावसाचा सामना करू शकतात. म्हणून सुरक्षित रहा आणि भारतीय कार चालवा '.

 

View this post on Instagram

 

Only Indian cars survive in this weather. Be safe. Drive Indian.

A post shared by Arjun (@rampal72) on

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या अमिताभ बच्चन आपल्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, डिंपल कपाडिया महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. यासह, अमिताभ बच्चन, आयुष्मान खुरानासोबत एक चित्रपटदेखील करणार आहेत. आजकाल बिग बी त्याच्या क्विझ शो 'केबीसी 11' बद्दलही चर्चेत आहेत.

VIDEO : भर सभेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांची स्फोटक मुलाखत

Published by: Akshay Shitole
First published: September 5, 2019, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading