'ही' अभिनेत्री लग्नाआधीच होती गरोदर, आता मुलीसोबत साजरा करणार व्हॅलेंटाइन डे

गेल्या वर्षी अशा पाच अभिनेत्रींनी लग्न केलं ज्यांच्या लग्नाची चर्चा फक्त भारतात नाही तर जगभरात झाली. त्यांचा हा लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेटाइन डे आहे.

  • Share this:

बॉलिवूडसाठी २०१८ हे वर्ष लग्नसोहळ्याच वर्ष होतं. एका सेलिब्रेटीचं लग्न होत नाही तोवर रांगेत इतर सेलिब्रिटीही लग्नाचं आमंत्रण घेऊन उभे होते. २०१८ मध्ये अशा पाच अभिनेत्रींनी लग्न केलं ज्यांच्या लग्नाची चर्चा फक्त भारतात नाही तर जगभरात झाली. त्यांचा हा लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेटाइन डे आहे.

सोनम कपूर- या मांदियाळीत अग्रणी आहे ती झक्कास अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरची. गेल्यावर्षी मे महिन्यात सोनमने तिचा प्रियकर आनंद अहुजाशी मुंबईत लग्न केलं. लग्नानंतरचा सोनमचा हा पहिला व्हॅलेंटाइन डे आहे.

नेहा धुपिया- नेहाने कोणालाही न सांगता तडका फडकी प्रियकर अंगद बेदीशी दिल्लीतील एका गुरुद्वाऱ्यात लग्न केलं. तिच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित होते. दोघांना काही महिन्यापूर्वी मुलगीही झाली. अंगद आणि नेहा एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. नेहा लग्नाच्याआधी गरोदर राहिल्यामुळे दोघांना घाईत लग्न करावं लागलं होतं. लग्नानंतर दोघंही आपला पहिला व्हॅलेंटाइन मुलगी मेहरसोबत साजरा करणार आहेत.

दीपिका पदुकोण- बॉलिवूडची पद्मावत म्हणजे दीपिका पदुकोणने अभिनेता रणवीर सिंगशी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये इटलीत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी बंगळुरू मुंबई आणि दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं. दोघांची पहिली भेट २०१३ मध्ये गोलियों की रासलीला- रामलीला सिनेमाच्या सेटवर झाली होती. लग्नानंतरचा दोघांचा हा पहिला व्हॅलेंटाइन डे आहे.

प्रियांका चोप्रा- बॉलिवूडच्या या देसी गर्लने डिसेंबर २०१८ मध्ये अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केलं. राजेशाही थाटात प्रियांकाचं लग्न पार पडलं. सध्या प्रियांका निकसोबत अमेरिकेतच राहत आहे. यावर्षी व्हॅलेंटाइन डेला हे सर्वांचं आवडतं जोडपं काय खास करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

युविका चौधरी- बॉलिवूडमध्ये छोटेखानी भूमिका करणारी अभिनेत्री युविका चौधरीनेही गेल्यावर्षी प्रियकर प्रिंस नरुलाशी लग्न केलं. २०१८ मध्ये ११ ऑक्टोबरला दोघं विवाहबंधनात अडकले. प्रिंस आणि युविकाची ओळख बिग बॉसमध्ये झाली होती. प्रिंस बिग बॉसचा विजेताही होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 10:10 AM IST

ताज्या बातम्या