मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'आता माझी सटकली'; सनी लियोनीचा हा जबरदस्त VIDEO होतोय VIRAL

'आता माझी सटकली'; सनी लियोनीचा हा जबरदस्त VIDEO होतोय VIRAL

सनी लियोनीचा हा VIDEO सध्या जोरदार VIRAL होत आहे.

सनी लियोनीचा हा VIDEO सध्या जोरदार VIRAL होत आहे.

सनी लियोनीचा हा VIDEO सध्या जोरदार VIRAL होत आहे.

मुंबई, 9 जून- बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) आपलं सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी लाखो फॅन्सना घायाळ करत आहे. त्यातही तिच्यावर चित्रित झालेली गाणी लक्षवेधी ठरतात. प्रत्येक गाण्यामधील तिची अदा, बोल्डनेस, डान्स स्टेप्सची केमिस्ट्री फॅन्सला आकर्षित करते. त्यामुळे चित्रपट असो शो असो किंवा सोशल मिडीया (Social Media) तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत असते.

सोशल मिडीयावरील तिच्या पोस्ट विशेष चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ती भलेही चित्रपटात किंवा शोमध्ये दिसली नसली तरी ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्ट असते. इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचे 45 दशलक्ष पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ती बऱ्याचदा मजेदार व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर करीत असते. या व्हिडीओ आणि फोटोंना फॅन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत असतो.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

नुकतीच सनी लियोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. सनीचा हा व्हिडीओ अत्यंत मजेशीर आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने `आता माझी सटकली` असं लिहीलं आहे. व्हिडीओत सनी कोणत्या तरी चित्रपटाचे शुटिंग करताना दिसत आहे.

(हे वाचा: 'फॅमिली मॅन 2' साठी 'या' कलाकारांना मिळालंय इतकं मानधन; ऐकून व्हाल थक्क   )

सनी लियोनीने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गमतीशीर असून, या व्हिडीओत ती चित्रपटाचं शुटिंग करताना दिसत आहे. या शुटिंगदरम्यान ती हवेत तरंगताना दिसत आहे. सनीचा हा स्टंट पाहून फॅन्स आश्चर्यचकीत झाले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टची कॅप्शन (Caption) विशेष आकर्षण ठरत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये सनीने `आता माझी सटकली` असं लिहीलं आहे. यावर तिच्या फॅन्सने जोरदार कमेंटस केल्या आहेत.

(हे वाचा:सुशांतची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण; प्रतिक बब्बरने केला मोठा खुलासा  )

यापूर्वी सनी लियोनीने तिचा एक डान्सिंग (Dancing) व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती विचित्र पध्दतीने डान्स स्टेप्स करताना (Dance Steps) दिसली. सनीच्या या डान्स स्टेप्सला फॅन्सकडून विशेष पसंती मिळाली होती, आणि या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला होता.  नुकताच सनीने आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. तिने जिस्म 2 या चित्रपटाव्दारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. त्यानंतर रागिनी एमएमएस 2 यासारख्या चित्रपटांमधून तिने अभिनय केला होता. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या रईस या चित्रपटातील `लैला` या गाण्यात तिने आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांवर गारुड घातलं होतं.

First published: