कंगना रणौतला बांधायचंय भव्य मंदिर; नेटकरी खिल्ली उडवत म्हणाले, काहीही झालं तरी तुला...

कंगना रणौतला बांधायचंय भव्य मंदिर; नेटकरी खिल्ली उडवत म्हणाले, काहीही झालं तरी तुला...

अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) आता भव्य मंदीर बांधायचं आहे. ट्वीट करुन तसं तिने सांगितलं आहे. हे ट्वीट चांगलंच व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर: बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या पोस्टच्या माध्यमातून ती बर्‍याचदा चर्चेत राहते. शेतकरी आंदोलनाच्या निषेधार्थ ट्विटनंतर कंगनाने पुन्हा ट्विट करून लोकांचे लक्ष वेधलं होतं. आता कंगनाने एक नवीन ट्वीट केलं आहे. यात तिने म्हटलं आहे की, ती एक विशाल मंदिर बांधण्याचा विचार करत आहे. अभिनेत्री कंगनाच्या या पोस्टवर लोकांनी बऱ्याच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

कंगना रणौतने तिच्या एका फोटोसकट ट्विट केलं आहे. त्यात कंगना लिहीते, ‘दुर्गा देवीनेच मला मंदिर बांधण्यासाठी निवडलं आहे. आपले पूर्वज जे करत आले आहेत त्यांचाच वसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. दुर्गा देवी अतिशय दयाळु आहे. मी जे काही मनापासून करीन त्याचा ती स्वीकार करेल. याची मला खात्री आहे. मी देवीचं एक विशाल मंदिर बांधणार आहे. जय माता दी. ’

कंगनाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर काहींनी तिच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. कंगनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते म्हणाले, 'आम्हाला आमच्या हिमाचलच्या मुलीचा अभिमान आहे, खूप चांगली कल्पना, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. तर एका नेटकऱ्याने तिच्यावर टीका केली आणि म्हटले की, काहीही झालं तरी तुला तिकीट मिळणार नाही. देवाला सुद्धा तुझा मंदिर बांधण्याचा हेतू माहिती आहे. आता कंगना खरंच मंदिर बांधणार का? हे येणाऱ्या काळाताच समजेल.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 10, 2020, 3:39 PM IST

ताज्या बातम्या