श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बॉम्ब हल्ल्यानंतर केली ‘ही’ मागणी

श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बॉम्ब हल्ल्यानंतर केली ‘ही’ मागणी

दहशतवाद्यांचा पहिला हल्ला सकाळी ९ वाजता झाला तर शेवटचा हल्ला दुपारी ३ वाजता झाला. अजून हल्ले होण्याच्या संशयामुळे श्रीलंकेत कर्फ्यू लावण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई, २२ एप्रिल- बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री आणि मूळची श्रीलंकेची असणारी जॅकलीन फर्नांडिसने ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा केली आहे. जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून आणि मलेशियन आहे. जॅकलिनने ट्वीट करत म्हटलं की, ‘श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब हल्ल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. याहून जास्त दुःख या गोष्टीचं आहे की हे लोकांना दिसत नाहीये की अशाप्रकारच्या हिंसेची साखळीच सुरू आहे. तातडीने ही गोष्ट थांबवली गेली पाहिजे.’

श्रीलंका बॉम्बस्फोटात थोडक्यात बचावली ही अभिनेत्री, ऋषी कपूरसोबतही केलंय काम

जॅकलीन स्वतः मुंबईमध्ये राहते. २००९ मध्ये अलादीन सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत जॅकलीनने १५ हून जास्त सिनेमांत काम केलं आहे. जॅकलीनसोबत अनेक बॉलिवूड कलाकारांनी या हल्ल्याचा सोशल मीडियावर निशेष केला. यात अनुष्का शर्मा, शेखर कपूर, अर्जुन कपूर, हुमा कुरेशी आणि आनंद ओबेरॉय सारख्या कलाकारांनी ट्विटरवर दुःख व्यक्त केलं.भारताच्या मित्र राष्ट्र श्रीलंकेतवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण जगात शोककळा पसरली आहे. श्रीलंकेत एका पाठोपाक एक असे एकूण आठ बॉम्ब हल्ले करण्यात आले. यात २०७ हून अधिक लोक मारले गेले तर ४५० हून लोक गंभीररित्या जखमी झाले. यात मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकही आहेत.

अक्षय कुमारने शेअर केला फोटो, तब्बल सहा वर्षांनंतर या अभिनेत्रीसोबत केलं काम
दहशतवाद्यांचा पहिला हल्ला सकाळी ९ वाजता झाला तर शेवटचा हल्ला दुपारी ३ वाजता झाला. अजून हल्ले होण्याच्या संशयामुळे श्रीलंकेत कर्फ्यू लावण्यात आला. तसेच सोशल मीडियावर बंधनं घालण्यात आली. इंटरनेट सेवाही काही भागांमध्ये बंद ठेवण्यात आली होती. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली नाही.

या पाच सिनेमांमुळे अमिताभ बच्चन झाले 'महानायक'

आलिया- रणबीरला एकत्र फिरताना पाहून युजर्स म्हणाले, 'आलिया नाराज दिसतेय'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2019 01:30 PM IST

ताज्या बातम्या