बहिणीला सोडून अजय देवगणला दिला इशिताने पाठिंबा, केलं मोठं वक्तव्य

बहिणीला सोडून अजय देवगणला दिला इशिताने पाठिंबा, केलं मोठं वक्तव्य

इशिता म्हणाली की, ‘मला माहितीये की, या प्रकरणात मी दोन्हीकडून अडकणार आहे. पण जे योग्य आहे ते योग्यचं आहे.'

  • Share this:

मुंबई, २१ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तनुश्री दत्तामध्ये सध्या शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. अजयच्या आगामी दे दे प्यार दे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आलोक यांच्यावर मीटू अभियानाअंतर्गत अनेक आरोप लगावण्यात आले आहेत. या सिनेमात अजयच्या वडिलांची भूमिका आलोक नाथ यांनी साकारली आहे. याच कारणामुळे तनुश्रीने अजयवर निशाणा साधला. याबद्दल अजयने स्पष्टीकरणही दिलं. आता या भांडणात तनुश्रीची बहीण इशिताही मध्ये आली. इशिताने आपल्या बहिणीची बाजू न घेता अजय देवगणला पाठिंबा दाखवला.

तनुश्री म्हणाली की, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत कोणालाच हे माहीत नव्हतं की सिनेमात आलोक नाथ आहेत. त्यांचे सीन पुन्हा शुट केले जाऊ शकत होते. यासोबतच तिने अजयला खोटारडा आणि दूतोंडी म्हटलं.

या सगळ्यात तनुश्रीची बहीण इशिताने अजयला समर्थन दिलं. इशिता म्हणाली की, ‘मला माहितीये की, या प्रकरणात मी दोन्हीकडून अडकणार आहे. पण जे योग्य आहे ते योग्यचं आहे. माझी बहीण सत्याची बाजू घेत आहे. अजय सरांसोबत माझं वेगळं नातं आहे आणि माझी बहीण याबद्दल काय विचार करते याचा काही संबंध नाही. मला नाही वाटत माझी बहीण जे बोलतेय त्यावरून त्यांचं आणि माझं नातं बिघडेल किंवा ते नाराज होतील. वत्सल (इशिताचा नवरा) आणि माझं अजय सरांच्या कुटुंबाशी एक वेगळं नातं आहे. अजय सर या सिनेमाचे निर्माते नाही आणि ते एकटे या गोष्टीला जबाबदार नाहीत. हा सर्वांचा निर्णय आहे. मला वाटतं की निर्माते या प्रकरणात काही करू शकले नसतील.’

इशिताने अजय देवगणच्या दृश्यम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यात तिने अजयच्या मुलीची भूमिका साकारली होती.

इशिताच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती कसम- तेरे प्यार की या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. पहिल्या सिझनमध्ये तिका सेंगर आणि शरद मल्होत्रा यांची मुख्य भूमिका होती. आता निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनसाठी इशाता दत्ताला साइन केले आहे. तिने कौन है या मालिकेत शेवटचं काम केलं होतं. या मालिकेत ती पती वत्सल सेठसोबतच दिसली होती. तर कपिल शर्माच्या फिरंगी सिनेमात तिने काम केलं होतं.

First published: April 21, 2019, 12:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading