Home /News /news /

BREAKING: सुशांतच्या मृतदेहाचा आला पोस्टमार्टम रिपोर्ट

BREAKING: सुशांतच्या मृतदेहाचा आला पोस्टमार्टम रिपोर्ट

कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचा पोर्स्टमार्टम झाला असून त्याचे अवयव पुढील तपासासाठी जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    मुंबई, 14 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचा पोर्स्टमार्टम झाला असून त्याचे अवयव पुढील तपासासाठी जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तिथे त्याच्या अवयवामध्ये कोणतंही विष आहे का याची तपासणी केली जाईल. तर सुशांतने आत्महत्याच केली असल्याची माहिती शवविच्छेदनातून समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतनं (sushant singh rajput suicide) आत्महत्या करत बॉलिवूडपासून सर्व देशवासियांना धक्का दिला. अद्याप सुशांतच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नाही आहे. मात्र पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सुरुवातीच्या माहितीनुसार सुशांतनं हिरव्या कपड्यानं आपल्या बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. पोलिसांना सुशांतच्या घरातून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही आहे. दरम्यान, मध्यरात्री सुशांतनं एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला. पण त्यानं फोन उचलला नाही, त्यामुळे दोघांचं बोलणं झालं नाही. रविवारी सकाळी दहा वाजता सुशांतने ज्यूस मागवला, आणि तो आपल्या खोलीत गेला. यानंतर सुशांतन बाहेर आलाच नाही. घरकाम करणाऱ्या नोकरांनी आणि मित्रानं दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार लॉक होतं, अखेर नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलवलं. त्यानंतर दरवाजा उघडला. दार उघडल्यानंतर सुशांतचा मृतदेह पाहून नोकरांनी पोलिसांना फोन केला. दुपारी 12.45 वाजता सुशांतच्या बेडरूमचा दरवाजा तोडण्यात आला. सुशांतसोबत वांद्रे येथील घरात 4 लोकं राहत होती. यात दोन कुक, एक नोकर आणि एक आर्ट डिझायनर होता, जो त्याचा मित्रही आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत 6 महिने नैराश्यात होता. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या