Home /News /news /

कॅन्सरनंतर अशी झाली संजय दत्तची अवस्था, व्हायरल PHOTO पाहून चाहते हैराण

कॅन्सरनंतर अशी झाली संजय दत्तची अवस्था, व्हायरल PHOTO पाहून चाहते हैराण

सोशल मीडियावर संजय दत्तचा एक फोटो व्हायरल होत आहे. संजय दत्तचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे अनेक चाहते हैराण आहेत. या फोटोमध्ये संजय दत्तचं वजन अतिशय कमी झाल्याचं दिसतंय.

  मुंबई, 5 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त Sanjay Dutt कर्करोगाने ग्रस्त आहे. संजय दत्तला चौथ्या स्टेजमधील लंग कॅन्सरचं, फुफ्फुसाच्या कर्करोगाचं Lung Cancer निदान झालं आहे. नुकतंच संजय दत्त आपल्या संपूर्ण कुटुंबासह दुबईला रवाना झाला होता. आता संपूर्ण कुटुंब दुबईहून मुंबईत परतलं आहे. यादरम्यान सोशल मीडियावर संजय दत्तचा एक फोटो व्हायरल होत आहे. संजय दत्तचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे अनेक चाहते हैराण आहेत. या फोटोमध्ये संजय दत्तचं वजन अतिशय कमी झाल्याचं दिसतं आहे. हा फोटो रुग्णालयातील स्टाफकडून काढण्यात आला आहे. फोटोमध्ये संजय दत्तसोबत एक महिला डॉक्टर दिसत आहे. संजय दत्तच्या या फोटोवर अनेक चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत असून त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
  ऑगस्ट महिन्यात संजय दत्तने स्वत: त्याला लंग कॅन्सर झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. सोशल मीडियाद्वारे त्याने ही माहिती शेअर केली होती. त्यानंतर जगभरातील अनेक चाहत्यांकडून त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी, तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. त्यादरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर संजय दत्तने कामातून ब्रेक घेतला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सडक 2 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Sanjay dutt

  पुढील बातम्या