या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाने केला अपघात, आता मागतोय नवीन महागडी कार

या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाने केला अपघात, आता मागतोय नवीन महागडी कार

आपल्या मुलाने कारला अपघात केल्याची माहिती त्याने यावेळी व्हिडिओद्वारे ट्विट करुन दिली. कमाल आर खान यानेही यासंदर्भात माहिती देत अपघाती कार दाखवली.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : स्वयंघोषित सिनेसमिक्षक अभिनेता कमाल आर खान (केआरके) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या मुलाने कारला अपघात केल्याची माहिती त्याने यावेळी व्हिडिओद्वारे ट्विट करुन दिली. कमाल आर खान यानेही यासंदर्भात माहिती देत अपघाती कार दाखवली. अपघातामध्ये कारचे बरेच नुकसान झालेले स्पष्टपणे दिसते. या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

खरंतर, कमाल आर खानने आपला मुलगा फैसल कमाल याने केलेल्या कार अपघाताविषयी दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्याने लिहिलं आहे की, 'माझ्या मुलाने कारचा अपघात केला आहे'. यासह त्याने एक व्हिडिओही शेअर केला.

यात तो असे म्हणतांना ऐकू येतो की, 'फैजल ऑफिसला जात होता आणि त्याने गाडीचा अपघात केला. गाडीचा अगदी चांगल्या, उत्तम प्रकारे त्याने अपघात केला आहे. पण ठिक आहे हरकत नाही.'

यानंतर कमालने आणखी एक ट्विट केलं. यात केआरके याने लिहिलं आहे की, 'कार अपघातामुळे फैसलला आता बीएमडब्ल्यू कार चालवायची इच्छा नाही. आता फैजल ऑडी आर 8 किंवा रेंज रोव्हरची मागणी करत आहे.

यानंतर त्याने यासंदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया मागितल्या. त्याने लोकांना ऑडी आर 8 आणि रेंजरोव्हरपैकी कोणती चांगली आहे हे लोकांना विचारलं. अभिनेता कमाल आर खानने देशद्रोही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. यानंतर तो बिग बॉसमध्ये भाग घेऊन अधिक प्रसिद्ध झाला.

First Published: Nov 17, 2019 09:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading