मुंबई, ३० जानेवारी २०१९- अनिल कपूर सध्या एक लडकी को देखा तो ऐसा लगा या त्यांचा आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या सिनेमात ते पहिल्यांदा मुलगी सोनम कपूरसोबत काम करणार आहेत. सिनेमात सोनम आणि अनिल कपूरशिवाय राजकुमार राव, जुही चावला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
मात्र अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मिड- डेला दिलेल्या मुलाखतीत स्वतः अनिल कपूर यांनी याबद्दल खुलासा केला आहे. त्यासोबतच उपचारांसाठी ते जर्मनीमध्ये जाणार असल्याचं म्हटलं आहे. अनिल म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या डाव्या खांद्यात कॅल्शियम जमा होत आहे. त्यामुळे डावा खांदा मंदावला आहे. याच्यावर उपचारांसाठी ते जर्मनीत जाणार आहेत.
अनिल यांनी पुढे सांगितलं की, खांद्याच्या वेदनेमुळे ते सिनेमातले कोणतेही स्टंट करू शकत नाही. यावर लवकरात लवकर उपचार घ्यावे लागतील. याआधीही त्यांना याच समस्येला तोंड द्यावं लागलं होतं. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पायाच्या खोटेने काम करणं बंद केलं होतं. यानंतर त्यांनी यावरही उपचार घेतले होते.
VIDEO : आपल्यापेक्षा 36 वर्ष लहान असलेल्या 'या' अभिनेत्याला रेखाने मारली मिठी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा