News18 Lokmat

शेतकऱ्यांना मिळालं कलिंगडाचं बोगस बियाणे, नुकसानभरपाईची मागणी

बोगस बियाण्यांमुळे वर्षीचा संपूर्ण हंगाम अडचणीत आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 06:15 PM IST

शेतकऱ्यांना मिळालं कलिंगडाचं बोगस बियाणे, नुकसानभरपाईची  मागणी

पुसद12 फेब्रुवारी : अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना कायम संकटांचा सामना करावा लागतोय. त्यातच पुसद तालुक्यातल्या शेतकऱ्यांना टरबुजाचं बोगस बियाणे मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या बियाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.


तालुक्यातल्या निंबी पारडी, भोजला ही गावे टरबूजाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चांगल्या  गुणवत्तेच्या टरबुज पिकांमुळे या गांवातील शेतकरी समृद्धही झाले आहेत. मात्र या बोगस बियाण्यांमुळे वर्षीचा संपूर्ण हंगाम अडचणीत आला आहे. याचा फटका तब्बल 22 शेतकऱ्यांना बसला आहे.


वसंतराव नाईक स्वावलंबन कृषि मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या शेतकऱ्यांची त्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली. बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याची सरकारने संबधीत कंपनीकडून भरपाई करावी अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.

Loading...


कृषी आणि संबंधित अधिकारी या भागाची पाहणी करतील आणि त्याचा अहवाल मिळाल्यावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन किशोर तिवारी यांनी दिलं आहे. तर नुकसानभरपायी मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा मनिष जाधव यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...