Home /News /news /

विमान उद्योगातील या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, 12 हजारांपेक्षा अधिकांची नोकरी जाणार

विमान उद्योगातील या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, 12 हजारांपेक्षा अधिकांची नोकरी जाणार

कोरोनाव्हायरस या जागतिक धोक्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहे.

कोरोनाव्हायरस या जागतिक धोक्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहे.

विमान बनवणारी आंतरराष्ट्रीय कंपनी बोईंग त्याच्या 12000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कोव्हिड-19 च्या संकटकाळात विमानसेवा बंद असल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

    नवी दिल्ली, 28 मे : विमान बनवणारी आंतरराष्ट्रीय कंपनी बोईंग त्याच्या 12000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कोव्हिड-19 च्या संकटकाळात विमानसेवा बंद असल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे कंपनी यानंतरही काही लोकांना कामावरून काढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग असणारी ही कंपनी या आठवड्यात 6,670 अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढणार आहे. तर 5,520 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे बोईंगने अशी घोषणा केली आहे की कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये 10 टक्के कपात होणार आहे. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 1,60,000 आहे. (हे वाचा-Google मध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार 75 हजारांचा भत्ता) कोरोना व्हायरस पँडेमिक (Coronavirus Pandemic) आणि त्याचे संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) व्यवहाराला फटका बसला आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरूवात केली आहे. मोठमोठ्या कंपन्या त्याचप्रमाणे अनेक स्टार्टअप्सनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. बेंगळुरूतील स्टार्टअप लिव्हस्पेसने त्यांच्या 15 टक्के म्हणजे 450 लोकांची कपात केली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात हा निर्णय घेतला. रोल्स रॉयसमध्येही कर्मचारी कपात कोरोना व्हायरसमुळे जगभरात विमान प्रवासाला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी एअरो स्पेस इंजिन बनवणारी कंपनी रोल्स रॉयस (Rolls Royce) ने देखील त्यांच्या जगभरातील जवळपास 9000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कंपनीचे एकूण 52,000 कर्मचारी आहेत. ही कपात नेमकी कुठे करण्यात आली आहे, याबाबत स्पष्टता नाही आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वारेन इस्ट यांनी असे सांगितले आहे की या काळात कंपनी सावरण्यासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. OLA ने देखील केली कपात कॅब अॅग्रीगेटर कंपनीने ओलाने रायडर्स, फायनान्शिअल सर्व्हिस आणि फूड बिझनेसच्या 1,400 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन महिन्यात कंपनीच्या महसुलात 95 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या