BMW ने भारतात लाँच केली 15.40 लाखांची बाइक; ‘ही’ आहे या लाखमोलाच्या गाडीची फीचर्स

बाइक लाँच करताच BMW ने सुरू केलं बुकिंग

News18 Lokmat | Updated On: May 15, 2019 02:53 PM IST

BMW ने भारतात लाँच केली 15.40 लाखांची बाइक; ‘ही’ आहे या लाखमोलाच्या गाडीची फीचर्स

नवी दिल्ली, 15 मे : बीएमडब्ल्यू (BMW) ने BMW F 850 GS Adventure ही लाखमोलाची बाइक भारतात लाँच काली आहे. या अॅडव्हेंचर बाइकची एक्स-शोरूम किंमत 15.40 लाख रुपये आहे. गेल्या वर्षी इटलीतल्या मिलान शहरात पार पडलेल्या EICMA-2018 मोटर-शो कंपनीने ही बाईक सादर केली होती. भारतात बाइक लाँच करताच BMW ने बुकिंग सुरू केलं आहे.

क्लासिक अॅडव्हेंचर लुक असलेल्या या बाइकचं फ्रंट व्हिल 21इंचाचं तर रियर व्हिल 17 इंचाचं असून, त्यांना क्रॉस स्पोक्स देण्यात आले आहेत. कंपनीने या अॅडव्हेंचर बाइकला हायमाऊंटेड एग्झॉस्ट तसंच फ्रंट व्हिल त्यास लागलेल्या क्रॉस स्पोक्सनां गोल्डन फिनिशिंग केलं आहे. बाइकचं फ्युएल टँक 23 लीटरच असून, ते 'स्टँडर्ड F 850 GS' या बाइकच्या टँकपेक्षा 8 लिटरने जास्त आहे. क्रॅश प्रोटेक्शन असलेल्या या बाइकचं वजन 244 किलोग्राम इतकं आहे.


OnePlus7 भारतात झाला लाँच; इथे पाहा First look आणि फीचर्स


Loading...

इंजिन - BMW ने आपल्या या नव्या अॅडव्हेंचर बाइकला 853cc इन-लाइन, पॅरलल-ट्विन इंजिन लावलं आहे. जे स्टँडर्ड F 850 GS या बाइकसारखं आहे. हे इंजिन 8,250rpm वर 95hp चं पावर आणि 6,250rpm वर 92Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनला 6-स्पीड गियरबॉक्स देण्यात आले असून, बाइकची टॉप स्पीड प्रति तास 197 किलोमीटर इतकी आहे.


फीचर्स - BMW ने 'F 850 GS Adventure'ला एलईडी हेडलाइट्स, अॅडजस्टेबल विंड स्क्रीन, अॅडजस्टेबल रियर ब्रेक आणि गियर लिव्हर्स, बॅश प्लेट देण्यात आले आहेत. या बाइकला 6.5 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आसून, त्यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय या अॅडव्हेंचर बाइकमध्ये ऑटोमॅटिक स्टॅबिलिटी कंट्रोलसह रेन आणि रोड रायडिंग स्टँडर्ड मोड्स देण्यात आले आहेत. डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल (DTC) आणि 'एबीएस प्रो'सह डायनॅमिक आणि अँड्युरो अशा दोन नावाने दोन ऑप्शनल रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2019 02:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...