शाहरुख खानला बीएमसीचा पुन्हा दणका, रेड चिलीजच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

शाहरुख खानला बीएमसीचा पुन्हा दणका, रेड चिलीजच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याला बीएमसीने पुन्हा दणका दिलाय. शाहरुखची मालकी असलेल्या रेड चिलीज कंपनीनं केलेलं अनधिकृत बांधकाम बीएमसीने पाडून टाकलंय.

  • Share this:

मुंबई, 5 ऑक्टोबर : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याला बीएमसीने पुन्हा दणका दिलाय. शाहरुखची मालकी असलेल्या रेड चिलीज कंपनीनं केलेलं अनधिकृत बांधकाम बीएमसीने पाडून टाकलंय. गोरेगाव पश्चिम परिसरातील रेड चिलीज बिल्डिंगवर महापालिकेने ही कारवाई केलीय. २ हजार चौरस फूट जागेवर हे अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. अनधिकृत बांधकाम केलेल्या परिसरात प्रामुख्याने उपहारगृह चालविले जात होते, अशी माहिती पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव यांनी दिली आहे. डीएलएच पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील अतिक्रमणावर ही कारवाई करण्यात आली आहे.

शाहरूखने यापूर्वी त्याच्या मन्नत बंगल्यासमोर त्याची व्हॅनिटी पार्क करण्यासाठी रस्त्यावरच अनधिकृत बांधकाम केलं होतं. स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर बीएमसीने तो कठडा तोडून शाहरूखला दंड देखील ठोठावला होता. पण त्यानंतरही शाहरूखची अनधिकृत बांधकामाची सवय मोडलेली दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2017 11:16 PM IST

ताज्या बातम्या