S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

बीएमसीत शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे 6 नगरसेवक फोडून वेगळ्या गटाची नोंदणी !

मुंबईत लवकरच आमचा महापौर बसवू, अशा गर्जना करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक फोडून मोठा दणका दिलाय, बीएमसीतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले असून वेगळ्या गटनोंदणीसाठी कोकण आयुक्तलयात धावही घेतलीय

Chandrakant Funde | Updated On: Oct 13, 2017 03:46 PM IST

बीएमसीत शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे 6 नगरसेवक फोडून वेगळ्या गटाची नोंदणी !

मुंबई, 13 ऑक्टोबर : मुंबईत लवकरच आमचा महापौर बसवू, अशा गर्जना करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक फोडून मोठा दणका दिलाय, बीएमसीतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले असून वेगळ्या गटनोंदणीसाठी कोकण आयुक्तलयात धावही घेतलीय. भांडूपच्या पोटनिवडणुकीनंतर भाजपचं संख्याबळ आणि शिवसेनेच्या संख्याबळात फक्त एका नगरसेवकाचा फरक राहिला होता. त्यामुळे बीएमसीतली सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा मास्टरस्ट्रोक खेळल्याचं बोललं जातंय.

शिवसेनेच्या या अनपेक्षित खेळीविरोधात भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी थेट ईडीकडे तक्रार केलीय. दरम्यान, शिवसेनेच्या या फोडाफोडीला मनसेनं विरोधा केलाय. शिवसेनेच्या मागणीवरून कोकण विभागीय आयुक्तांनी कोणताही गट स्थापन करू नये. अशी मागणी मनसेनं केलीय. तर शिवसेनेच्या या खेळीमुळे आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close