Home /News /news /

मुंबईत तब्बल 7 लाख नव्या मतदारांची नांदी, सत्ता कुणाला द्यायची ते तरुण ठरवणार

मुंबईत तब्बल 7 लाख नव्या मतदारांची नांदी, सत्ता कुणाला द्यायची ते तरुण ठरवणार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तरुणांच्या मतदानाला जास्त महत्त्व असण्याची शक्यता आहे.

    विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 25 जून : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं (BMC Election 2022) बिगूल केव्हाही वाजू शकतं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात अटीतटीची लढत होऊ शकते. मुंबई महापालिका गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण शिवसेनेला टक्कर देवून महापालिका काबीज करायची असा भाजपचा प्रयत्न आहे. याशिवाय राष्ट्रवादी, काँग्रेसदेखील मुंबईत आपला विस्तार वाढवण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने रणनीती आखत आहे. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत तब्बल 7 लाख नव्या मतदारांची वाढ झाली आहे. नव्या मतदारांची एवढी मोठी वाढ पाहता मुंबई महापालिकेत सत्ता कुणाला द्यायची याचा फैसला तरुणदेखील घेऊ शकतात, असं चित्र आहे. मुंबई महानगर पालिकेकडून मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचनेनुसार या यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. यावर्षी तरूण 7 लाख मतदारांची वाढ झालीय. यावर्षी मुंबई महानगरपालिकेत नव्याने 9 प्रभागांची वाढ झाली आहे आणि याच वाढीमुळे प्रभागातील नागरिकांची मतदान यादीत बदल झाले असून याचीच माहिती मुंबई महानगर पालिकेच्य संकेतस्थळ आणि निवडणूक आयगोच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. त्याच बदलेल्या प्रभागामुळे नावांची आदलाबदल होण्याची भिती दिसून येत असल्यामुळे महापालिकेच्या वतीने हरकती आणि सुचना दाखल करण्यासाठी 1 जुलैपर्यंत तारीख देण्यात आली आहे. (मुंबई हायअलर्टवर, राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नवे आदेश जारी) जर प्रभाग यादीत नाव चुकीचे असेल तर तुम्हाला महापालिकेच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोदंवून नाव बदली करून घ्यावे लागेल. जाताना तुम्हाला मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड घेऊन जावे लागेल. यानंतर याची दुरूस्त अंतिम यादी 9 जुलै रोजी महापालिकेच्या आणि निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित होईल.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: BMC, Mumbai

    पुढील बातम्या