बीएमसीच्या 'फेरी'वाल्यांच्या झोनमध्ये कोण अडकलं, कोण सुटलं ?

बीएमसीच्या 'फेरी'वाल्यांच्या झोनमध्ये कोण अडकलं, कोण सुटलं ?

मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या यादीनुसार चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दारात फेरीवाले बसणार असल्याचं उघडकीस आल्यानंतर आता, मुंबईतल्या सेलीब्रिटी आणि मोठ्या व्यक्तीच्या घरासमोर फेरीवाले बसणार आहेत का याची महिती घेणं औत्सुक्याचं ठरेल. याचाच हा स्पेशल रिपोर्ट

  • Share this:

प्रणाली कापसे, प्रतिनिधी

17 जानेवारी, मुंबई : मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या यादीनुसार चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दारात फेरीवाले बसणार असल्याचं उघडकीस आल्यानंतर आता, मुंबईतल्या सेलीब्रिटी आणि मोठ्या व्यक्तीच्या घरासमोर फेरीवाले बसणार आहेत का याची महिती घेणं औत्सुक्याचं ठरेल. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याबरोबरचं बॉलीवूडचंही केंद्र आहे. त्यामुळं मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपट सृष्टीतील कलाकार इथं राहतात.

एक नजर टाकूया बीएमसीच्या यादीनुसार कोणाकोणाच्या दारात फेरीवाले बसणार आहेत आणि कोण फेरीवाल्यांच्या फेऱ्यातून सुटणार आहेत. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे फेरीवाल्यांचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेरच्या रस्त्यावर मात्र 'नो हॉकर झोन' जाहीर करण्यात आलाय.

यांच्या घरासमोर असतील फेरीवाले

-संजय दत्त यांच्या पालीहीलच्या घराबाहेर १० फेरीवाले असतील

- नारायण राणे यांच्या जुहू तारा रोडच्या घरासमोर असतील ३६ फेरीवाले

- अमिर खान यांच्या 12th रोड,बांद्रा इथल्या घरासमोरच्या रस्त्यावर असतील १० फेरीवाले

- नाना पाटेकर यांच्या माटूंग्याच्या घराबाहेरच्या सेनापती बापट रोडवप सुमारे १०० फेरीवाले असतील

-सिद्धार्थ जाधव यांच्या घरासमोर सुद्धा हे फेरीवाले असतील

- वंदना गुप्ते यांच्या शिवाजी पार्कच्या घरासमोर सुद्धा हे फेरीवाले असतील

-नीना कुलकर्णी यांच्या माहिमच्या घरासमोरच्या रस्त्यावर

- सीनियर सोनाली कुलकर्णी यांच्या एस व्ही रोडच्या घराबाहेरही फेरीवाले असती

- नाना पाटेकरच्या मांटुग्यांच्या घरासमोर फेरीवाले बसणार तर अंधेरीच्या घरासमोर फेरीवाले नसणार 

फेरीवाल्यांच्या फेऱ्यातून हे सेलिब्रिटी मात्र सुटले !

अमिताभ बच्चन

लता मंगेशकर

सचिन तेंडूलकर

सलमान खान

शाहरुख खान

शिल्पा शेट्टी

First published: January 17, 2018, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading