बीएमसीचं 27 हजार 258 कोटींचं बजेट सादर, कोणतीही करवाढ नाही !

बीएमसीचं 27 हजार 258 कोटींचं बजेट सादर, कोणतीही करवाढ नाही !

मुंबईच्या मनपा आयुक्तांनी आज 27 हजार 258 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात कोणतीही नवी करवाढ सुचवण्यात आलेली नाही.गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात 1406 कोटींची वाढ सुचवण्यात आलीय.

  • Share this:

02 फेब्रुवारी, मुंबईः मुंबईच्या मनपा आयुक्तांनी आज 27 हजार 258 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात कोणतीही नवी करवाढ सुचवण्यात आलेली नाही.गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात 1406 कोटींची वाढ सुचवण्यात आलीय. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 2569 कोटींची वाढ तर रस्ते विकासासाठी 2028 कोटींची तरतूद सुचवण्यात आली. तर कोस्टल रोडसाठी 1500 कोटींची वाढ सुचवण्यात आलीय.

बीएमसी अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे -

आयुक्तांनी महापालिकेच्या २०१८-१९ अर्थसंकल्प सादर केला

२७२५८ कोटी चा अर्थसंकल्प सादर, गेल्या वेळेपेक्षा १४०६ कोटींची वाढ

गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प २५१४१ इतका होता.

शिक्षण समितीचे २५६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

गोरेगाव मुलूंड लिंक रोडसाठी १०० कोटी

कोस्टल रोडसाठी १५०० कोटीची तरतूद

मार्चपर्यंत २०% आणि डिसेंबर पर्यंत उर्वरीत ८०% एलईडी दिवे लावणार

बेस्टला डेपो ऑटोमेशनसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये देणार

रस्त्यांसाठी १२०२ कोटींची तरतूद

आता पादचारी पुलाला एस्कलरटर्स लावले जातील

रस्ते विभागासाठी एकूण २०५८ कोटींची तरतूद

संयुक्त महाराष्ट्र दालनात व्हर्च्युअल रिएलिटी शो सुरु करणार

८ नवे जलतरण तलाव बांधणार

कफ परेड इथं भराव टाकून ३०० एकर जमिनीवर ग्रीन पार्क उभारणार

मुलुंड डंपिंग ग्राऊंड मधल्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी ६५ कोटी

देवनार येथून वीज निर्मिती प्रकल्पासाठी ११० कोटीची तरतुद

राणीच्या बागेच्या विकासाठी १२० कोटींची तरतूद

अग्निशमन दलासाठी फायर ड्रोन आणि रोबोट खरेदी करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 04:23 PM IST

ताज्या बातम्या