अनिल कपूरच्या बेकायदेशीर ऑफिसवर बीएमसीचा हातोडा

अनिल कपूरच्या बेकायदेशीर ऑफिसवर बीएमसीचा हातोडा

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर याच्या सांताक्रूझ परिसरातील ऑफिसमधील बेकायदेशीर पार्टीशनवर बीएमसीने हातोडा चालवलाय. अनिक कपूरने आपल्या ऑफिसमध्ये विना परवाना काही पार्टीशन्स टाकले होते. मात्र, हे वाढीव काम करताना पालिकेची परवानगी घेणं आवश्यक असतं, पण अनिक कपूरकडून अशा प्रकारची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती.

  • Share this:

28 नोव्हेंबर, मुंबई : बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर याच्या सांताक्रूझ परिसरातील ऑफिसमधील बेकायदेशीर पार्टीशनवर बीएमसीने हातोडा चालवलाय. अनिक कपूरने आपल्या ऑफिसमध्ये विना परवाना काही पार्टीशन्स टाकले होते. मात्र, हे वाढीव काम करताना पालिकेची परवानगी घेणं आवश्यक असतं, पण अनिक कपूरकडून अशा प्रकारची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती.

याच बेकादेशीर बांधकामप्रकरणी बीएमसीने अनिल कपूरला गेल्या सप्टेंबर महिन्यातच रितसर नोटीसही धाडली होती पण या नोटीसीला अनिल कपूरने साधी दखलही न घेतल्याने सरतेशेवटी पालिकेने गेल्या शुक्रवारी हे विनापरवाना बांधकाम पाडून टाकलंय. बीएमसीच्या एच-वेस्ट विभागाकडून ही कारवाई करण्यात आलीय. सांताक्रूझ परिसरात अनिल कपूरच्या अडीच हजार स्वेअर फूटाचं आलिशान ऑफिस आहे. तिथल्याच अनधिकृत बांधकामावर पालिकेनं हातोडा चालवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 11:54 PM IST

ताज्या बातम्या