'ब्लू व्हेल' गेमच्या 'अॅडमिन'ला रशियात अटक

जगभरातील जवळपास 130 मुलांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या 'ब्लू व्हेल' गेमच्या अॅडमीनला पोलिसांनी अटक केलीय. ही अॅडमीन रशियाची असून 17 वर्षांची आहे. ती अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी तिचं नाव जाहीर केलेलं नाही.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2017 03:53 PM IST

'ब्लू व्हेल' गेमच्या 'अॅडमिन'ला रशियात अटक

मॉस्को, 1 सप्टेंबर : जगभरातील जवळपास 130 मुलांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या 'ब्लू व्हेल' गेमच्या अॅडमीनला पोलिसांनी अटक केलीय. ही अॅडमीन रशियाची असून 17 वर्षांची आहे. ती अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी तिचं नाव जाहीर केलेलं नाही.

ब्लू व्हेल गेमचं टास्क पूर्ण न करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना ही मुलगी ठार मारण्याची धमकी देत असे. आणि या धमक्यांच्या दबावाखाली येवून मग हा खेळ खेळणारी मुलं आत्महत्येला प्रवृत्त होत होती. रशियन पोलिसांनी या मुलीच्या अटकेचं फुटेजही रिलीज केलंय. ही 17 वर्षीय मुलगी मानसशास्त्राची विद्यार्थीनी आहे. तिच्या घरी ब्लू व्हेल गेमचा मूळ निर्माता फिलीप बुडेखिन याचे फोटोही आढळून आलेत. पोलिसांनी या बुडेखिनला यापूर्वीच अटक केली असून त्याला 3 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आलीय. पण तरिही या मुलींसारखे काहीजण हा जीवघेणा गेम ऑपरेट करून मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करताना आढळून आलीत.

आत्तापर्यंत जगभरात 130 पेक्षा जास्त मुलांनी मोबाईलवर हा खेळ खेळताना आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतासह जगभरात अनेक देशांनी या जीवघेण्या ब्लू व्हेल मोबाईल गेमवर बंदी घातली आहे.

हा गेम कसा खेळला जातो ?

Loading...

गेम डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हा गेम साध्या डोळ्यांनी खेळता येत नाही. त्यासाठी 'व्हर्च्युअल रिअॅलिटी डिव्हाईस'ची गरज असते, त्यानंतरच तुम्ही त्या गेममध्ये प्रवेश करु शकता. एकदा का तुम्ही त्या गेममध्ये प्रवेश केला की तुम्हाला रोज एक टास्क देण्यात येतं. यात 50 टास्क असतात. 50 व्या दिवशी तुमच्या आयुष्यासोबत हा गेम संपतो.

ब्लू व्हेल गेममधील जीवघेणी 'टास्क' ?

- तुमच्या हातावर किंवा खांद्यावर एक ठराविक गोष्ट कोरुन घ्यायची

- पहाटे 4.20 वाजता उठा आणि तुमच्या गेमच्या प्रमुखानं पाठवलेला भयानक व्हिडीओ बघा

- तुमच्या खांद्यावर ब्लेडमध्ये कट मारुन घ्या...

- कागदावर व्हेल माशाचं चित्र काढा

- तुम्हाला व्हेल बनायचं असेल तर तुमच्या पायावर S असं कोरा, नाही तर तुमच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी कट मारुन घ्या.

- त्यानंतर तुम्हाला सिक्रेट टास्क मिळतो

- आलेला सिक्रेट मेसेज तुमच्या खांद्यावर कोरुन घ्या

- तुम्ही व्हेल असल्याचा ऑनलाईन मेसेज टाका

- पहाटे 4.30 वाजता उठून टेरेसवर जा

- स्वत:च्या हातावर व्हेल कोरुन घ्या

- दिवसभर भयानक व्हिडिओ बघा

- गेम प्रमुखानं पाठवलेलं संगीत ऐका

- स्वतःचे ओठ कापून घ्या

- स्वत:च्या शरीरावर जखमा करुन घ्या

- टेरेसच्या कठड्यावर उभं रहा. आणि पाय बाहेर सोडून कठड्यावर बसा

- पुलावर उभं राहा

- दिवसभर कुणाशीही बोलू नका

- दरम्यान, गेमप्रमुख तुमच्या मरणाची तारीख ठरवतो

- तुम्ही व्हेल आहात, हे कुणालाही सांगू नका अशी गोपनियतेची शपथच घ्यावी लागते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...