बीड,ता.27 एप्रिल: बीड जिल्ह्यातल्या आष्टीत फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट होऊन तीन जण ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झालेत.या स्फोटात दोन घरंही जळाली. आष्टीतील शेकापूर रोडवरची ही घटना आहे.
आष्टीत फटाके बनवण्याचा व्यवसाय चालतो. वर्षभर इथून महाराष्ट्रभर आणि बाहेरही फटाके निर्यात केले जातात. आष्टीत मौलवी बाबाच्या उत्सवानिमित्त रोषणाई करण्यात येत असते.
त्यासाठी फटाके बनवण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाला. कडक उन्हाळा आणि योग्य काळजी घेतली नसल्यानं हा स्फोट झाल्याचा प्रार्थमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Blast, Death, Firecrackers, Maharashtra