भर उत्सवात फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, एका तरुणीचा मृत्यू 5 जण गंभीर जखमी

भर उत्सवात फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, एका तरुणीचा मृत्यू 5 जण गंभीर जखमी

गावात एका दरग्यावर उत्सव सुरू असल्यामुळे तिथे फुगेवला आला होता. त्याच्याकडे फुग्यामध्ये हवा भरण्यासाठी असलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.

  • Share this:

बब्बू शेख, प्रतिनिधी

मालेगाव, 16 डिसेंबर : मालेगावमध्ये घोडेगाव चौकीमध्ये फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून यात 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ नजिकच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

गावात एका दरग्यावर उत्सव सुरू असल्यामुळे तिथे फुगेवला आला होता. त्याच्याकडे फुग्यामध्ये हवा भरण्यासाठी असलेल्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. आता उत्सव म्हटल्यावर आजूबाजूला लहान मुलांची आणि नागरिकांची वर्दळ होती. अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला आणि धावपळ सुरू झाली.

या स्फोटामध्ये एका 15 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांकडून या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर सिलेंडरचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

इतर बातम्या - दिल्ली, यूपीनंतर मुंबईतूनही निषेध सुरू, TISSमध्ये विद्यार्थ्यांकडून बहिष्कार

विरारमध्ये मोबाईल शॉपवर चोरट्यांकडून गोळीबार, मालकाचा जागीच मृत्यू

विरार पूर्व कुंभारपाडा इथे मोबाईल शॉपवर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी मोबाईल शॉप मालक आणि त्याच्या मेव्ह्ण्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मालक विशाल गुप्ता याचा मृत्यू झाला असून विजयकुमार गुप्ता यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरारमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे शहरात खळबळ माजली आहे.

कुंभार पाडा इथल्या रिद्धीसिद्धी मोबाईल अँड स्टेशनरीच्या दुकानात रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने तोंडाला रुमाल बांधून गुप्ता यांच्या दुकानात शिरले.  त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानाचे शटर आतल्या बाजूने खेचून दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विजयकुमार आणि विशाल गुप्ता या दोघांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.

इतर बातम्या - CAA Protest: जामिया, AMUमध्ये हिंसाचारानंतर तणाव; या शहरांत प्रवेश बंद

या झटापटीत एका चोरट्याने त्याजवळ असलेल्या गावठी कट्टा काढला आणि  विशाल, विजयकुमार या दोघांवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी विशाल गुप्ता याच्या छातीत लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर एक गोळी विजय कुमार याच्या पायाला लागली. त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: December 16, 2019, 12:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading