S M L

बीपीसीएल कंपनी स्फोटात 41 जण जखमी,आग नियंत्रणात

Updated On: Aug 8, 2018 07:58 PM IST

बीपीसीएल कंपनी स्फोटात 41 जण जखमी,आग नियंत्रणात

मुंबई, 08 आॅगस्ट : मुंबईतील चेंबूर येथील बीपीसीएल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटानंतर आगडोंब उसळला आहे. या स्फोटात 41 जण जखमी झाले होते. त्यापैकी 22 जणांना बीपीसीएलच्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना चेंबूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं.

मुंबईतील चेंबूर माहुलगाव परिसरातील बीपीसीएल रिफायनरी कंपनीच्या हाॅड्रो क्रॅकर युनिटमध्ये हा स्फोट झाला होता. दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. हा स्फोट इथका भीषण होता की माहुल गावाला हादरा बसलाय. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हा हादरा इतका जोरदार होता की जणू काही भूकंप आला असं वाटलं होतं. रिफायनरीपासून जवळ असलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्यात. स्फोट झाल्यानंतर  कंपनीमधून मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ येत आहेत.  संवदेनशील परिसर असल्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने रिफायनरीच्या शेजारील इमारती खाली करण्यात आल्या होत्या.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल झाल्या होत्या.  तब्बल साडेचार तास आग विझवण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही.

बीपीसीएल आणि पूर्व भाग संवेदनशील

1995 मध्ये भारत पेट्रोलियम तेल कंपनीची रिफायनरी उभारण्यात आली. प्रतिवर्षी 12 मिलियन मेट्रिक टन तेलसाठा शुद्धीकरणाची क्षमता या कंपनीत आहे. या रिफायनरीला ISO 9001 मानांकन आहे.

Loading...
Loading...

मुंबईचा पूर्वेकडचा पट्टा अतिशय संवेदनशील समजला जातो. या भागात भाभा अणुसंशोधक केंद्र आणि त्यालगत देशाला इंधन पुरवठा करणाऱ्या एपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) या ऑईल रिफायनरीज आहेत. या ऑईल रिफायनरीजमध्ये एका वेळी 20 लाख किलो लिटर इतका पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि इतर इंधनाचा साठा असतो. 700 एकरवर पसरलेल्या या परिसरात 200 मोठे इंधन साठे आहेत. इथं स्फोट झाला तर तब्बल 2 किलोमीटरचा परिसर पूर्णपणे उद्‌ध्वस्त होईल, असं तज्ज्ञ सांगतात.

ऑईल रिफायनरीज किती सुरक्षित ?

2012 मध्ये गुप्तचर विभागाच्या इशार्‍यानंतर रिफायनरीजजवळच्या 57 निवासी इमारती रिकाम्या करण्यात आल्या. तसंच BARC ची सुरक्षा CISF आणि DAE या दोन सुरक्षा यंत्रणांच्या हाती असल्यानं समन्वयाचा अभाव आढळून आलं.  जुलै 2012 मध्ये करण्यात आलेल्या मॉक ड्रीलमध्ये BARCजवळच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आणि टाटा पॉवर प्लान्टमध्ये अतिरेकी किती सहजपणे घुसू शकतात, हे उघड झालंय.

संबंधीत बातम्या

 LIVE : बीपीसीएल स्फोटात 21 जण जखमी

बीपीसीएल रिफायनरीत आगडोंब, दुर्घटनेचा पहिला VIDEO

 बीपीसीएल रिफायनरीत स्फोट,दुर्घटनेचे पहिले PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 04:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close