Home /News /news /

बेडरुममध्ये डोळ्यांदेखत पत्नीला पाहिलं प्रियकरासोबत, पतीने अख्खं घर बॉम्बने उडवलं

बेडरुममध्ये डोळ्यांदेखत पत्नीला पाहिलं प्रियकरासोबत, पतीने अख्खं घर बॉम्बने उडवलं

आपल्या खोलीत पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे पतीने थेट घरावर बॉम्ब हल्ला केल्याचं समोर आलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    अयोध्या, 02 फेब्रुवारी : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये अनेक धक्कादायक गुन्ह्याचे प्रकार समोर आले. असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. आपल्या खोलीत पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे पतीने थेट घरावर बॉम्ब हल्ला केल्याचं समोर आलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्याच्या काशिराम कॉलनीत स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. या स्फोटात दोन लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर श्री राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्यामधील कांसीराम कॉलनी येथे एका स्कूटरस्वाराल्याने देशी बॉम्बस्फोट घडवला आहे. यात दोन लोक जखमी झाले. हा बॉम्ब पती-पत्नीच्या वादात फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पतीने खोलीमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि त्याने थेट घरावर बॉम्ब फेकल्याचं समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणात पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती, याचा त्याला खूप राग आला होता. यापूर्वी त्याने अनेकदा पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. शनिवार तो तिच्या घरी गेला असता त्याने खोलीमध्ये पत्नीला आणि तिच्या मित्राला पाहिलं. यानंतर त्याचा पारा चढला आणि त्याने बॉम्ब हल्ला करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत. इतर बातम्या - पारस छाब्राच्या गर्लफ्रेंडला Bigg Boss च्या घरातील ‘या’ स्पर्धकाशी करायचंय लग्न या बॉम्ब हल्ल्यामध्ये पत्नी आणि तिचा प्रियकर गंभीर जखमी झाले आहे पण त्यांच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. त्यामुळे पत्नी त्याच्यापासून लांब राहत होती. याचा पतीला राग होता. कार्यक्षेत्र अधिकारी अमर सिंह यांनी सांगितले की, पती-पत्नीच्या वादारामध्ये पतीने घरावर बॉम्ब हल्ला केला आहे. या संपूर्ण प्रकरणात आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. इतर बातम्या - निर्दयी! भर चौकात केला पत्नीचा खून, हातात कापलेले शीर घेऊन निघाला चालत
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Uttar pradesh news

    पुढील बातम्या