Black Trailer- टेररिज्म का कोई चेहरा नहीं होता. उसका धर्म सिर्फ पैसा और...

Black Trailer- टेररिज्म का कोई चेहरा नहीं होता. उसका धर्म सिर्फ पैसा और...

अनेक दिवसांपासून डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचं म्हटलं जातं होतं. अखेर करणच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला.

  • Share this:

मुंबई, ४ एप्रिल- अनेक दिवसांपासून डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचं म्हटलं जातं होतं. अखेर करणच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. सिनेमाचं नाव आहे ब्लॅक. यात सनी देओल एका पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारत आहे. याशिवाय इशिता दत्ता आणि करणवीर शर्मा यांच्याही मुख्य भूमिका सिनेमात आहे. ट्रेलरला अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात सनीच्या दमदार संवादाने होते. ट्रेलरमध्ये सनी म्हणतो की, ‘टेररिज्म का कोई चेहरा नहीं होता. उसका धर्म होता है सिर्फ पैसा आणि हमारा धर्म ड्युटी.’ ट्रेलर पाहून कळतं की दहशतवाद्याच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा बांधण्यात आली आहे. ताहीर अलहीम नावाची एक पाकिस्तानी दहशतवादी संघटना भारतात बॉम्ब स्फोट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारतात सुसाइड बॉम्बर पाठवतात. याबद्दलची माहिती इंटेलीजन्स ब्यूरोला मिळते. सनी आपल्या टीमसोबत त्या सुसाइड बॉम्बरला शोधायला सुरुवात करतो.

सुसाइड बॉम्बरची व्यक्तिरेखा करण कपाडिया साकारत आहे. सनी त्याला शोधेल इतक्यात सुसाइड बॉम्बर एका अपघातात आपली स्मृती गमावतो. करणच्या शरीरावर बॉम्ब बसवण्यात आलेला असतो, पण हा बॉम्ब कसा त्याच्या शरीरावर लावण्यात आला याबद्दल त्याला काहीच माहीत नसते. कदाचित तो काहीही आठवत नसल्याचं नाटकंही करत असेल. हे खरंय की खोटं हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये भरपूर अक्शन सीक्वेन्स दाखवण्यात आले आहेत. यात सनीसोबत करणही अक्शन सीन करताना दिसत आहे. बेहजाद खंबाटाने या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून येत्या ३ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

VIDEO : चव्हाणांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले...

First published: April 4, 2019, 7:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading