कोसळलेल्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला

कोसळलेल्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला

घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अग्निशमन दल आणि मदत पथकाला हा ब्लॅक बॉक्स सापडला आहे.

  • Share this:

मुंबई,ता.28 जून : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अग्निशमन दल आणि मदत पथकाला हा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला आणि आग लागली. त्यानंतर अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि एनडीआरफची टीम घटनास्थळी दाखल झाली.

मदत पथकाने विमानाचा काही भाग कापून काढला आणि मलबा हटवण्यात आला. त्याचवेळी ब्लॅक बॉक्स शोधण्याचं कामही सुरू होतं. त्या शोधकार्यावेळीच ब्लॅक बॉक्स सापडल्याने विमानाच्या अपघाताचं घरं कारण कळणार आहे. विमानापर्यंत पोहोचणं शक्य असल्याने ब्लॅक बॉक्स शोधायला फारसा वेळ लागला नाही.

मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पायलटनं स्वीकारला मृत्यू

भर वस्तीत विमान कोसळलं, पहा हे भीषण फोटो

विमानाचा अपघात झाल्यानंतर मदत पथक सर्वात आधी ब्लॉक बॉक्सच्या शोधात असते. मुंबईतल्या गजबजलेल्या घाटकोपर परिसरात कोसळेल्या विमानानं काही वेळापूर्वीच जुहूच्या धावपट्टीवरून उड्डाण घेतलं होतं. या विमानाची पायलट महिला होती अशीही माहिती मिळाली होती.

टेस्टिंग साठी हे विमान निघालं होतं मात्र काही वेळातच विमानात तांत्रिक बघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानात बिघाड झाल्याचं कळताच पायलटने खुल्या जागेत विमान उतरविण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालंय. हा परिसर अतिशय दाटीवाटीचा आहे.

LIVE : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, महिला पायलटसह 5 जणांचा मृत्यू

पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली आहे. सी-90 जातीचं हे विमान असून मुंबईच्या युवाय एव्हिएशनने हे विमान उत्तरप्रदेश सरकारकडून विकत घेतलं होतं अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी दिली आहे.

या आधी अलाहाबादला या विमानाला अपघात झाला होता त्यानंतर डागडुज्जी करून हे विमान विकण्यात आलं होतं. 12 आसनी हे विमान असून या अपघातामुळं त्याच्या देखभालीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.

बातम्

First published: June 28, 2018, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading