उत्तर प्रदेश, 06 फेब्रुवारी : भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मंगळवारी उत्तर प्रदेशमध्ये आयोजित एका संमेलनाला गेले होते. या कार्यक्रमाच्या शेवटीचा असा काही व्हिडिओ समोर आला की ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. खरंतर या कार्यक्रमाच्यावेळी एक चोरीची घटना समोर आली. त्या चोराला काही भाजप कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याचाच हा व्हिडिओ आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकत्यांना ताब्यात घेतलं आहे.