चंद्रपूर, 07 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना आता राजकीय पक्षाचे कार्येकर्तेच दारू तस्करी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपच्या एका युवा कार्यकर्त्याला दारू तस्करी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपयांची देशीदारू जप्त करण्यात आली आहे.
असगर खान असं दारू तस्करी करणाऱ्या भाजप नेत्याचं नाव आहे. जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र, काहींसाठी ही दारूबंदी सुवर्णसंधी ठरल्याचं चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
शेजारच्या जिह्यातून दारू आणायची आणि ती जास्त पैशांनी विकत काहींनी धंदा सुरू केला. यात आता राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे आता स्पष्ट झालं आहे.
असगर खान हा घुग्घुस इथला भाजपचा कार्यकर्ता आहे. असगर रात्री ( एमएच-२९ झेड-७०७०) स्कॉर्पिओ वाहनानं सहकारी सुशील रॉबर्ट यांच्यासह दारू घेऊन चंद्रपूरकडे निघाला होता. याची गुप्त माहिती गस्तीवर असलेल्या पडोली पोलिसांना मिळाली.
गाडीचा पाठलाग करून एमआयडीसी परिसरात ही गाडी पकडण्यात आली. दरम्यान, गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये १ लाख २० रुपयांची दारू आढळून आली. त्यानंतर ती दारू जप्त करून असगरला अटक करण्यात आली आहे.
VIDEO: 'राज ठाकरे स्वत: शिवसेना सोडून गेले आहेत... हवं तेव्हा त्यांनी परत यावं'