भाजप सरकारचा माजी मंत्री म्हणाला UPमध्ये मोदींना मिळणार 15 जागा

भाजप सरकारचा माजी मंत्री म्हणाला UPमध्ये मोदींना मिळणार 15 जागा

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला केवळ 15 जागा मिळतील असा दावा भाजप सरकारच्या माजी मंत्र्यानं केला आहे.

  • Share this:

लखनऊ, 14 मे : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला केवळ 15 जागा मिळतील असा दावा भाजप सरकारच्या माजी मंत्र्यानं केला आहे. तर, 55 ते 60 जागा सपा – बसपा आघाडीला मिळतील असं देखील या मंत्र्यानं म्हटलं आहे. ओमप्रकाश राजभर असं माजी मंत्र्याचं नाव आहे. यावर ओमप्रकाश थांबले नाहीत तर दिल्लीतील पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर दलिताची लेक बसेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. ओमप्रकाश राजभर हे भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत. योगी सरकारमध्ये त्यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी देखील होत. पण, लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून झालेल्या वादावरून त्यांनी योगी सरकारची साथ सोडली. राजभर न्यूज18शी बोलत होते.

भाजपकडे आम्ही घोषीच्या जागेची मागणी केली होती. पण, ती देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजपसोबत नाहीत असं देखील ओमप्रकाश राजभर यांनी स्पष्ट केलं.

ममतांचं मीम्स प्रकरण : प्रियांका, तु चुकलीस माफी माग - SC

आणखी काय म्हणाले राजभर

पूर्वांचलमधील किमान 30 जागांवर आमची साथ नसल्यामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल असं राजभर म्हणाले. गोरखपूर, गाजीपूर आणि बालियामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल असं देखील ओमप्रकाश राजभर यांनी म्हटलं आहे.

सपा – बसपाबाबत काय म्हणाले राजभर?

सपा – बसपावर प्रश्न विचारल्यानंतर राजभर यांनी राजकारणात सर्व पर्याय खुले असतात असं उत्तर दिलं. भाजपला 15 तर, सपा – बसपाला 55 ते 60 जागी विजय मिळेल असं ओमप्रकाश राजभर यांनी म्हटलं आहे. तर, काँग्रेसला कमी जागा मिळतील असा अंदाज राजभर यांनी व्यक्त केला. भाजपनं निगमची जागा देत आम्हाला भीक नाही दिली. त्याबदल्यात त्यांना आम्ही मतं दिल्याचं राजभर यांनी म्हटलं आहे.

VIDEO: एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही- शरद पोंक्षे

First published: May 14, 2019, 2:29 PM IST

ताज्या बातम्या