भाजपने जारी केला व्हिडिओ, CM केजरीवालांना दाखवलं खलनायक

भाजपने जारी केला व्हिडिओ, CM केजरीवालांना दाखवलं खलनायक

दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. मात्र असं असतानाही राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे दिल्लीतील राजकीय हवा गरम झाली आहे. भाजपनं तर केजरीवाल यांच्याविरोधात एक व्हिडिओ ट्विट करून त्यांना AAPचा खलनायक संबोधलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी:  दिल्लीत प्रचंड थंडी असली तरी  राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप आणि आपमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. भाजपनं मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात एक व्हिडिओ ट्विट केल्यानं खळबळ उडाली आहे.  भाजपनं केजरिवाल यांच्याविरोधात एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओतून भाजपनं केजरीवाल यांना AAPचा खलनायक संबोधलं आहे.

भाजप आणि आम आदमी पार्टीत सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत झडत आहेत.  राजकीय आरोपाचा भाग म्हणून भाजपनं सुपरहिट चित्रपट 'नायक'मधील काही भाग फोटो शॉप करून एडिट करून तो ट्विट केला आहे. 'नायक' चित्रपटातील एडिट केलेला भाग भाजपनं नागरिकत्त्व संशोधन विधेयकाविरोधात दिल्लीत झालेल्या हिंसाचाराशी जोडला आहे.  एडिट केलेल्या भागात अनिल कपूर, अमरीश पुरी यांची मुलाखत घेत असलेला भाग दाखवण्यात आला आहे. या मुलाखतीतील अमरीश पुरीच्या चेहऱ्याच्या जागी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे. चित्रपटातील इतर व्यक्तींच्या चेहऱ्यांच्या जागी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांचा चेहरा लावण्यात आला आहे. सिसोदीया यांच्यासोबत आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांचा चेहरा लावून व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

चित्रपटाला सीएए हिंसेशी जोडलं

'नायक' चित्रपटात झालेल्या हिंसेला दिल्लीत झालेल्या CAAच्या विरोधातील हिंसाचाराशी जोडण्यात आले आहे. 'नायक' चित्रपटात झालेल्या हिंसाचाराचे दृश्य आणि त्यातील डायलॉग एडिट करून ते CAAच्या विरोधात झालेल्या हिंसेशी जोडण्यात आले आहे. चित्रपटात अनिल कपूर याने विचारलेल्या प्रश्नाला एडिट करून त्याचा संबंध जामिया विद्यापीठात भडकलेल्या हिंसाचाराशी जोडण्यात आला आहे. या व्हिडिओत लोकं बसेसला आग  लावताना दाखवण्यात आले आहे.  एवढचं नाही तर आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांना सीएए आंदोलकांच्यामध्ये भाषण देत असल्याचं दाखवण्यात आले आहे.  दिल्लीत CAAविरोधात झालेल्या हिंसेला भाजपनं आम आदमी पार्टीला जबाबदार धरलं आहे.

8 फेब्रुवारीला मतदान, 11 ला निकाल

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी पुढील महिन्याच्या 8 तारखेला मतदान पार पडणार आहे. तर 11 फेब्रुवारीला निकाल येणार आहे.  निवडणूक आयोगाकडून मतदान आणि निकालासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.  दिल्लीत 1 कोटी 46 लाख मतदार आहे. वरिष्ठ नागरिक पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावणार आहे.  मतदानच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर दिल्लीत आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. 70 सदस्यीय दिल्ली विधानसभेचा कार्यकाल 22 फेब्रुवारीला संपणार आहे. त्या आधी नव्या विधानसभा निर्माण होणं गरजेचं आहे.

First Published: Jan 12, 2020 05:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading