Home /News /news /

कोरोनाचं संकट राहिलं बाजूला राज्यात राजकारण पेटलं, भाजपचं आंदोनला महाविकास आघाडीकडून प्रत्यूत्तर

कोरोनाचं संकट राहिलं बाजूला राज्यात राजकारण पेटलं, भाजपचं आंदोनला महाविकास आघाडीकडून प्रत्यूत्तर

राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नसून केंद्राने दिलेला पैसा राज्य सरकार खर्च करायला तयार नाहीये अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे.

    मुंबई, 22 मे : महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असतानाच राज्यात राजकारणही पेट घेत आहे. ठाकरे सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी भाजपने 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन सुरुवात केली आहे. राज्याच्या विविध ठिकाणी या आंदोलनाला सुरूवात झाली असून अनेक बडे नेते हे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर सत्ताधारी काँग्रेसनं याला 'भाजप बचाओ' आंदोलन असं म्हटलं आहे. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीनं महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड ट्विटरवर सुरु केला आहे. राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नसून केंद्राने दिलेला पैसा राज्य सरकार खर्च करायला तयार नाहीये अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. 'रुग्णालयात ऍडमिट होण्यासाठी फिरावं लागत आहे अशी परिस्थिती आहे. बिकेसीला सेंटर तयार केलं जात आहे जे दोन दिवसांत भरून जाईल, पावसाळ्यात काय करणार? केंद्रानं सर्व प्रकारचं रेशन उपलब्ध करून दिलं आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही धान्य मिळण्याची तरतूद केली आहे, मात्र, राज्य सरकारने स्वतः काहीही केलेलं नाही' अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. नक्षलवादी हल्ल्यात वडिलांना गमावलं, कोरोनाशी लढताना पोलीस आईने सोडले प्राण मुंबई इथल्या भाजपा प्रदेश कार्यालयात आंदोलन सुरुवात झाली असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार असे अनेक महत्त्वाचे मंत्री या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील महाआघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी राज्यात सर्व ठिकाणी भाजपने आंदोलनाला सुरुवात केली आहे. 'माझ आंगण माझे रणांगण' अंतर्गत राज्य सरकार विरुद्ध भाजपने पुकारलेल्या आंदोलनात अनेक बड्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र बचावसाठी सकाळी 11 ते 12 या वेळात कार्यकर्ते आपल्या घरासमोर काळे मास्क वा बीजेपीचे झेंडे व हातामध्ये बॅनर घेऊन सरकारचा निषेध करत आहेत. क्वारंटाइन सेंटरमधला धक्कादायक प्रकार, महिलांना साड्यांऐवजी दिली लुंगी दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यभरातील मंत्र्यांच्या घराबाहेर फलक लावून पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते निषेध करतील. यासह, लोक घराच्या छतावर काळं वस्त्र परिधान करून किंवा काळे पट्टे घालून, अंगणात दोन रिंगण बनवून सरकारविरूद्ध आपला निषेध नोंदवतील. ते पुढे म्हणाले की, या संकटाच्या कामात आम्हाला राजकारण करायचं नाही. परंतु, जेव्हा कोरोनाचं संकट लोकांमध्ये सातत्याने वाढत आहे अशा वेळी मौन बाळगणं शक्य नाही. कोरोना संकटात महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारनं अद्याप कोणतंही पॅकेज जाहीर केलेलं नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. विकृती! वासनेची भूक भागवसाठी दफन केलेला मुलीचा मृतदेह काढला बाहेर, शरीरसंबंध ठेव संकलन, संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या