Home /News /news /

भाजपला धक्का! महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, या नगरपरिषदेवर मिळवला ताबा

भाजपला धक्का! महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, या नगरपरिषदेवर मिळवला ताबा

बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषद चमत्कारीकरित्या भाजपकडून महाविकास आघाडीच्या ताब्यात आली आहे.

    नांदेड, 1 ऑक्टोबर: बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषद चमत्कारीकरित्या भाजपकडून महाविकास आघाडीच्या ताब्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक फुटल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. गुरूवारी ऑनलाइन पद्धतीनं अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 10 मतं मिळाली तर तर भाजप उमेदवाराला केवळ 6 मतं मिळाली. शिवसेनेचा 1 सदस्य तटस्थ राहिला. हेही वाचा...रोहित पवारांचा भाजपला दणका, कर्जत-जामखेडमधील 5 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात पक्षीय बलाबल भाजप - 10, काँग्रेस - 4 शिवसेना - 3 आज मिळालेली मते महाविकास आघाडी - 10, भाजप - 6, तटस्थ - 1 कुंडलवाडी नगरपरिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्षा अरुणा कुडमुलवार अपात्र ठरल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. अरुणा कुडमुलवार यांना दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता आलं नाही. त्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागानं कुडमुलवार यांना पूर्वलक्षी प्रभावानं अपात्र ठरवलं होतं. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांनी 7 सप्टेंबरला जारी केले होतं. 10 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपरिषदेच्या पूर्वीच हा निर्णय आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडली होती. 16 डिसेंबर 2016 रोजी कुंडलवाडी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. नगराध्यक्ष पद हे ओबीसी (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित होते. भाजपकडून अरुणा विठ्ठल कुडमुलवार यांनी तर काँग्रेसकडून अर्चना भीम पोतनकर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अरुणा कुडमुलकर या विजयी झाल्या होत्या. निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावयाचे होतं. मात्र, अरुणा कुडमुलकर यांना मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करता आलं नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या लढतीत अशोक चव्हाणांची सरशी झाली. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला केवळ नांदेडच्या बालेकिल्यातच नव्हे तर औरंगाबादमध्येही मोठे यश मिळाले. भाजपने मुखेड आणि कुंडलवाडी नगरपालिकांची सत्ता मिळवली असली तरी उर्वरित पालिकांमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. हेही वाचा...आपण नक्की जिंकू...आत्महत्या हा पर्याय नाही, संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन हदगाव, बिलोली, मुदखेड, देगलूर नगरपालिका आणि अर्धापूर नगरपंचायतीचा समावेश आहे. तर धर्माबाद व उमरी पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कंधार नगरपालिकेवर शिवसेनेने झेंडा फडकवला. या पालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आली नसली तरी जिल्ह्यातील 9 पैकी सहा पालिकांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
    First published:

    पुढील बातम्या